मला अचानक रामेश्वरम येथे लिंगार्चन सप्ताहासाठी जाण्याचा योग आला. माझ्या ध्यानीमनी नसताना मी हा सोहळा पहिला. त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजते.
आम्ही ८ फेब.ला नांदेड येथून ओखा - रामेश्वरम या गाडीने गेलो पण हा अनुभव वेगळाच होता कारण पूर्ण गाडीत आमचेच एकूण ७०० लोक होते. संपूर्ण गाडी आमचीच होती दिवसभर आपापल्या नातेवाईक आणि मैत्रिणी यांना भेटत होतो, काही मैत्रिणी तर २५-३० वर्षांनी भेटल्या ,त्यामुळे खूप छान वाटले. असे वाटत होते कि आपलेच घर आहे. आमच्यासाठी गाडी पण स्टेशन वर १५ मिनिटे थांबवली हे एक रेकोर्ड होते.
१० फेब.ला सप्ताह सुरु झाला.पहिला दिवस असल्याने कार्यक्रम सुरु व्हायला जरा वेळ लागला पण थोड्या वेळाने सर्व सुरळीत सुरु झाले.
आमचे जिथे कार्यक्रम होते तिथून एका बाजूला समुद्र तर एका बाजूला मंदिर होते.सगळे जवळच असल्याने खूपच सोयीचे होते.
हा कार्यक्रम साधू महाराज सेवा समिती कंधार आणि पंढरपूर यांचे कार्यकर्ते आणि साधू महाराज यांचे वंशज प.पु.एकनाथ महाराज आणि प.पु.ज्ञानेश्वर महाराज यांनी आखला होता.सर्व कार्यक्रम सुंदर आयोजित केला होता, ७०० ते ८०० लोकांची दोन वेळा जेवण,एक वेळा नाश्ता,दोन वेळा चहा आणि राहण्यास उत्तम व्यवस्था केली होती. सर्वाना धन्यवाद द्यावे तेव्हढे थोडेच आहेत.
सकाळपासून कार्यक्रम सुरु असत,सकाळी साधारण ५ वाजता उठत असू. सकाळी प्रथम रामेश्वर देवतेचे दर्शन घेवून सुरुवात होत असे. त्यानंतर साधुसुधा ग्रंथ आणि शिवलीलामृत ग्रंथ वाचन होत असे. त्यानंतर नाश्ता, लगेचच भजन सुरु होत असे. भजन झालेकी १ ते ३ जेवण. ग्रंथ वाचन सामुहिक असल्याने तिथे एक वेगळेच वातावरण असे. एकदम भारावल्या सारखे वाटत असे. भजनाचे वेळी टाळांचा आवाज तर किती तरी दिवसांनी ऐकला. भजनात पण रंगून जायला होत असे. महाराज तसेच टाळकरी पण इतके तद्रूप होवून गात कि कान तृप्त होत असत.
संघ्याकाळी ५ ते ७.३० पर्यंत लिंगार्चन पूजा चालत असे. दोन्ही महाराज त्यांची पत्नी आणि कुटुंबातील व्यक्ती तसेच साघारण ५०० लोक काळ्या मातीपासून लिंग करत असत आणि दररोज त्याचे विविध प्रकारचे आकार करून पूजा करीत असत. सर्व ब्रह्मवृंद जेह्वा उच्च स्वरात मंत्र घोष करीत आणि लघुरुद्र आणि शिव महिम्न म्हणत असत तेह्वा अगदी अंगावर रोमांच उभे राहत असत,वातावरण अगदी भारावून जात असे. ३ तास कसे गेले कळत नसे.
दररोज वाराप्रमाणे आकार बनवीत असत सूर्य, नटराज ,देवी, स्वस्तिक, विठोबा आणि साधू महाराज यांची प्रतीकृती बनवत असत.लिंगार्चन पूजेनंतर
जवळच असलेल्या समुद्रावर वीसर्जनासाठी टाळ मृदुंगाच्या घोषात निघत असत. सगळे देहभान विसरून नाचत असत,फुगड्या खेळत असत.स्त्री,पुरुष
भेदभाव विसरला जाई.
दुसरे दिवशी करवीर पीठाचे जगत्गुरू स्त्री.शंकराचार्य आले. त्यांचे येण्याने तर सगळे वातावरण मंगलमय होवून गेले. काही तरी प्रभा फाकल्यासारखे झाले होते. सगळे अगदी भारावून गेले होते. त्यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.त्यांचे एक एक शब्द मनात साठवून ठेवण्य सारखे होते. पुष्प वृष्टी करून त्यांचे स्वागत केले गेले.
सकाळपासून कार्यक्रमाची एह्वढी धावपळ असे कि दिवस कसा संपत असे कळत नह्वते, तिथे समुद्राची आंघोळ करायची आणि मंदिरात असलेल्या २२ कुंडावर जावून ओल्यानेच आंघोळ करायची हा अनुभव पण वेगळाच होता. अंगावर बादलीने भडाभड पाणी ओतत असत.
सकाळी ५ वाजता उठून शिवाचे स्फटिक लिंगाचे दर्शन घेणे हा एक स्वर्गीय अनुभव आहे. दिव्याच्या उजेडात स्फटिक असे चमकते कि , जणू काय हिरा चमकतो आहे. देवावर दुधाचा अभिषेक हा पण छान अनुभव. दिवसभर देवळात बसले तरी कंटाळा येणार नाही. कुणी शिवलीलामृत पारायण केले.
रात्री देवाची वेगवेगळ्या चांदी आणि सोन्याच्या वाहनावरून मिरवणूक काढतात. शिवरात्री मुळे तिथे उत्सव चालू होता.सगळे मंदिर सुशोभित केले होते.
मंदिरावर फुले माळा आणि लाईट लावून मंदिर सुशोभित केले होते.
टाळकरी आणि महाराज यांनी मंदिरात दिंडी काढून खूपच छान उपक्रम केला.मंदिरात टाळ गर्जत असताना एकदम प्रसन्न वाटत होते.लोक देहभान विसरून नाचत होते.
शेवटच्या दिवशी तर कहरच झाला. पूर्ण शहरातून नगर प्रदक्षिणा केली. लोक शीव नामाचा जयघोष करत होते. आणि बेभान होवून नाचत होते, असे वाटत होते नटराजच यांच्यात संचारला आहे.
मंगळवारी सर्व सुवासिन स्त्रिया यांनी कुंकुमार्चन केले.देवीच्या फोटोला कुंकू वाहिले आणि ब्राम्हण यांनी देवीची सहस्त्र नावे घेतली. हा पण कार्यक्रम नियोजनबद्ध झाला.
एके दिवशी दोन्ही महाराज यांचे लग्नाचे वाढ दिवस आले सर्व भक्तांनी मिळून त्यांना सरप्राइज दिले.ब्राम्हण वृंदाने मंत्राचा जयघोष केला ,त्यांचेवर
पुष्पवृष्टी केली आणि त्यांना भेटी दाखल अंगठी आणि शाल देवून त्यांचे सत्कार केले. खूपच छान कार्यक्रम झाला.
शेवटच्या दिवशी एकमेकांचा निरोप घेताना खुपच भारावून गेलो. शेवटी
काल्याचे कीर्तन झाले आणि सप्ताहाची सांगता झाली. एकूण सगळा कार्यक्रम एकदम सुंदर झाला. पुढील सप्ताह द्वारका येथे होण्याचे जाहीर केले गेले. मध्येच एक दिवस कन्याकुमारी आणि मदुराई येथे जावून आलो. हि दोन्ही
ठिकाणे पण खूपच प्रेक्षणीय आहेत.
मीनाक्षी मंदिर पण खूपच सुंदर आहे, मंदिरात खूपच नाजूक नकशीकाम केलेले आहे, असे सात हजार खांब तेथे आहेत. एका ठिकाणी तर एक हजार खांब
आहेत आणि त्यावर लाईट सोडलेले आहेत. ते पण खूपच सुंदर आहे. तसेच शिवाचे मंदिर पण खूपच अप्रतिम आहे. एकूण हा कार्यक्रम खूपच छान झाला एकदम स्मरणात राहील असा .
ध्यानीमनी नसताना मला हा सुंदर आणि अप्रतिम सोहळा पाहायला आणि अनुभवायला मिळाला त्याबद्दल मी परमेश्वराचे अतिशय आभार मानते
आणि पुढील जीवनात देखील असेच सोहळे पाहायला मिळावेत अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करते.