Thursday, October 3, 2013

BAR HARBOR




          साउथ विंडसर पासून अंदाजे ४०० मैल अंतरावर उत्तरेकडे कॅनडा बोर्डर जवळ असणाऱ्या बार हार्बर या ठिकाणी आम्ही गेलो होतो. इथून ६ तास प्रवासासाठी लागले . रस्ता तर खुपच सुंदर होता.


       तिथे पोचल्या पोचल्या आधी बीच mountain वर गेलो. खालून वर पोचन्या साठी ,। .' ७ मैल जावे लागले, चढण सगळी दगडाचीच होती, मोठ मोठे दगड आणि ते सरळ रेषेत उभे असे सर्व चढून आम्ही गेलो. रॉक क्लायम्बिंग करून गेलो. छोटा जय सुद्धा न थकता वर चढला . मी ही आयुष्यात पहिल्यांदाच  एव्हढी खडतर वाट चढले पण न थकता चढले .
 

       वर गेल्या गेल्या जे विहंगम दृश्य दिसले त्याने थकवा कुठल्या कुठे पळून गेल. चारही बाजूने हिरवे कच्च डोंगर ,एका बाजूला समुद्र त्यात छोटे छोटे आयर्लंड आणि छोटी छोटी दिसणारी घरे हे विहंगम दृश्य पाहून भान हरपले . चारी दिशेला हेच दृश्य त्यामुळे कुठे पाहावे आणि कुठे नाही हे समजत नव्हते. अर्धा तास थांबलो तरीही तिथून हलावेसे वाटत नव्हते. फोटो काढून  ते दृष्य  डोळ्यात साठवून ठेवले 


          आणि दुसर्या वाटेने परत निघलो. हा रस्ता तर अजूनच सुंदर होता.  इकडे वेगळेच  दृश्य  होते. मोठ मोठी सरोवरे ,त्या भोवती हिरवी हिरवी झाडे आणि डोंगर, वरून जाणारे खाली उतरतील असे वाटणारे ढग अप्रतिम दृश्य होते.



     उतरणारा रस्ता पण दगड धोंडे आणि खाच खळगे यांचाच होत.
पण एव्हढी यातायात करून वर गेलो ते खूप चांगले झाले. दृश्य डोळ्यात साठवून ठेवण्य सारखेच होते.

  
       तिथून समुद्रावर लाईट हाउस पाहण्यासाठी गेलो आणि सुंदर सूर्यास्त देखील बघितला .



      रात्री रिसोर्ट वर आलो तर काळोख होता, सकाळी उठून काचेतून बाहेर बघितले तर एकदम आश्चर्यच वाटले कारण बाहेर सुंदर पौंड होता आणि त्यात सुंदर बदके पोहत होती,. सगळीकडे हिरवळ आणि लाल पानाची झाडे अप्रतिम दृश्य होते.

         राम ,जय आणि श्रीकांत यांनी तर मस्त बोटिंग केले, आणि जय,राम यांनी बदकांना खायला देवून एन्जॉय केले.





           सगळीकडे हिरवळ आणि हिरवळ खुपच छान वाटत होते.नास्ता उरकून ११ वाजता कॅडीलक mountain वर निघलो. रस्ता तर इतका गुळगुळीत होता कि गालीचा वरून चाललो आहोत असे वाटत होते. रस्ता खूपच देखणा  होता .दोन्हि बाजूला मोठ मोठ्या झाडांची कमान होती आणि त्यात नागमोडी वळणे घेणारा रस्ता बापरे काय छान वाटत होते.
 



             एक चढण चढलो आणि सर्वांनी ओहो असे उद्गार काढले कारण समोर तसे अप्रतिम दृश्य होते. एका बाजूला प्रचंड पाणीच पाणी, दुसरीकडे हिरवे हिरवे मखमल पसरलेले डोंगर,त्यावर हळुवार चालणारे ढग,तसेच आकाशात सुद्धा नुसती ढगांची गर्दी झाली होति.






                  ते पाहून बालकवींची कविता आठवली, हिरवे हिरवे  गार गालिचे हरित तृणाच्या मखमलिचे.अहाहा काय म्हणून वर्णन करवे. स्वर्गात आहोत असेच वाटत होते.





          रस्त्यात उतरून फोटो काढत होतो तर मागे इतके ढग आले कि आम्ही जणू काय ढगातून विहार करत आहोत.



         जस जसे वर जाऊ तास तसे धुक्याची शाल पांघरून डोंगर बसलाय असे वाटत होते. धुके गडद गडद झाले आणि हवा पण बोचरी झलि. तिथे थांबावेसे वाटेना, काही वेळाने धुके थोडे कमी झाले आणि खालील स्वर्गीय दृश्य पाहून थक्क झालो. खाली एक गाव होते, छोटी  छोटी घरे,समुद्र त्यात छोटीछोटी  शिडाची जहाजे आणि ठळक दिसणारे तीन आयर्लंड  अहाहा काय सुंदर देखावा होता तो.


      जणू काय स्वर्गात आल्या सारखेच वाटत होते कितीही डोळ्यात साठवून ठेवले तरी मन भरत नव्हते. ते निसर्ग सौंदर्य इतके विलक्षण होते कि कितीही पहिले तरी समाधान होत नव्हते .


           ते सर्व क्यामेर्यात बंदिस्त होणे शक्य नव्हते, तिथे एक ट्रेल होता तो पण पोर आणि प्रीती, श्रीकांत यांनी तो घेतला, पोर बिलकुल दमली नाहीत .


            त्यानंतर डाऊन टाऊन ला गेलो तिथे छान फ्रेश पिझ्झा खाल्ला, आणि  शेजारीच असलेल्या बार हार्बर बंदरावर गेलो. डाऊन टाऊन देखील एकदम देखणे होते, छोटी छोटी मस्त दुकाने होती, त्यात एखाद दुसरे गिर्हाईक खरेदी करत असायचे .



        काठावर सुंदर सुंदर हॉटेल्स तसेच सुंदर सुंदर बागा होत्य. सगळीकडे हिरवळ होती तसेच शिडाच्या मोठ्या नवा तसेच एक मोठे शिप पण होते. तसेच मगाशी आम्ही कडीलक mountain  वरून बघितलेले तीन आयर्लंड देखील होते.  इथेही समुद्राच्या काठा काठाने एक सुंदर ट्रेल होत.
 



       हार्बर वरती एक छान लाकडी पूल होता त्यावर सुंदर सुंदर फुलांच्या कुंड्या ठेवलेल्या होत्या त्या समुद्राच्या पार्श्व भूमीवर उठून दिसत होत्या .





         तिथून हुटर point ला गेलो तिथे तर सगळीकडे पाणीच पाणी असा आथांग समुद्र होता . पाणी क्षितिजाला टेकले होते. ते पाहून आपण किती लहान तोकडे आहोत याची जाणीव होत होति.


              हूटर  point ला स्टार फिश मिळतात असे कळले पण आमची निराशा झालि. 
     

          समुद्राच्या कडेकडेने इतका सुंदर गुळगुळीत रस्ता होता कि कितीही फिरून मन भरत नव्हते. तिथून जोर्डन point ला गेलो तिथे धुके असल्याने काही पाहता आले नाही पण सुंदर बाग बघितलि. तसेच छान रेस्तारंत पण होते.

                अशा तर्हेने आमची हि बार हार्बर ट्रिप खूपच सही आणि सुंदर झालि. एकदा तरी बर हार्बर ची ट्रिप करावीच असे हे ठिकाण आहे.
  
         
       

Monday, July 8, 2013

BMM CONVANTION , PROVIDENCE , USA

     अमेरिकेतील ऱ्होड  आयलंड या राज्यातील PROVIDENCE  या ठिकाणी ५ ते ७ जुलै रोजी बि एम एम चे १६  वे अधिवेशन झाले, माझ्या मुलीने २ महिन्यापूर्वी त्याचे बुकिंग केले होते आम्ही पण इथे असल्याने आम्हाला त्याचा आस्वाद घेण्याचा योग आला ते बरेच झाले , कारण आम्ही भारतात सुद्धा एव्हढा सुंदर प्रोग्राम बघितला नव्हता, खूपच सुंदर आयोजन केले होते.
         पहिल्या दिवशी महेश मांजरेकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले . त्यानंतर मराठी भाषेचे महत्व सांगणारा आणि त्याचा इतिहास सांगणारा एक प्रोग्राम झाला . त्यात त्यांनी दिंडी काढली, पंढपूर ची वारी दाखवली, आणि विविध संताची माहिती दिलि.


                



   
             त्यानंतर प्रेमाचे आणि त्यागाचे महत्व सांगणारा  र्हदयनाथ  मंगेशकर यांच्या गाण्यावर आधारित स्वर गंगेच्या काठावरती हा  कार्यक्रम झाला त्यातील कलाकार स्थनिक BOSTON येथील होते त्यांनी पण खूप छान सादरीकरण केले
     त्यानंतर फमिली ड्रामा हे मराठी  कलाकारांनी सादर केलेले  नाटक होते, त्याची हि कथा खूप सुंदर होति. त्यात घरातील  पुरुष शिस्तीचा असतो पण घरात आलेल्या आगंतुक पाहुण्यामुळे त्याच्या जीवनात कसा फरक पडतो हे दाखवले, त्यात सुकन्या  कुलकर्णी, अजित भुरे,भक्ती देसाई आणि निखिल राउत यांनी खूपच छान कामे केलि.
                                                                                                                                                             एकाच वेळी दोन ते तीन स्टेज वरती वेगवेगळे कार्यक्रम असत, स्टेज आणि हॉल खूपच भव्य होता आणि गोलाकार बैठक होतो.
         झी टि . व्हि. ने एक योजना ठेवली होती त्याप्रकारे त्यांनी सोडत काढून प्रेत्येकी १००० डॉलर बक्षिस  ठेवले होते, त्यांच्या तर्फे सा रे ग म प हा कार्यक्रम ठेवला होता त्याची फायनल होती,त्याचे परीक्षक  राहुल देशपांडे आणि पद्मजा फेणाणी होते.  मी पण एक मराठी गाणे गायले . एकाच वेळी दुसरीकडे प्रशांत दामले यांची पण मुलाखत चालू होती त्याला प्रेक्षकांनी खूप गर्दी केल्याने तो कार्यक्रम दोनवेळा घ्यावा लागला . तसेच वाशिंगटन च्या लोकांनी वस्त्रहरण हे नाटक  सादर केले .


               दुसर्या दिवशी पुरुष आणि स्त्रिया यांनी  डोक्याला फेटा आणि नऊवार साडी   घालून सर्वांचे  अत्तर लावून  आणि गुलाब पाणी शिंपडून स्वागत केले. एक स्त्री एक डॉलरला  मोगऱ्याचा गजरा ओरडून ओरडून विकत होति. सर्वांनी पारंपारिक पोषाख करून बहार आणली .
   

             कार्यक्रमा साठी खूप मराठी  कलाकार आले होते त्यांच्या सोबत फोटो काढण्याची हौस पुरवून घेतलि. जसे प्रशांत दामले, भार्गवी चिरमुले, पद्मजा फेणाणी, आतिषा  नाईक, निखिल राउत ,राहुल देशपांडे ,सारेगामा चे वादक यांच्या सोबत फोटो काढून घेतले, भारतात सुद्धा एव्हढे कलाकार कधी  एकत्र आले नसते. प्रिया  बापट, वैभव मांगले, उमेश कामत, सोनाली कुलकर्णी, अभिजित खांडकेकर,अनिकेत विश्वासराव  हे पण होते. 
       


      providence ही  सिटी खूपच सुंदर होती , आमचे हॉटेल कॅपिटल  बिल्डींग च्या  समोरच होते, रस्त्यावर खूप रंगीबेरंगी फुले फुलली होती सगळीकडे प्रसन्न वातावरण होते.
           
           providence हे शहर ऱ्होड आयलंड या राज्याची राजधानी असून त्यांचे विधानभवन म्हणजे कॅपिटल  बिल्डींग आहे ती अगोदर appointment घेवून बघता  येते.

              हॉल तर एव्हढे मोठ मोठे होते कि एका वेळी  तीन ते चार हजार लोक  जेवायला बसू शकत होते, पदार्थाची तर एव्हढी रेलचेल होती कि, काय खावे कळत नव्हते. प्रत्येक टेबलावर भारतीय गुढी, आकाश दिवा, तुळशी वृंदावन ठेवलेलं होते. तसेच जेवणात आणि सकाळचा नाश्त यात सर्व भारतीय पदार्थ होते. पुरणपोळी, थालीपीठ, मिसळ, वडापाव, भाजी, पुलाव ,सोलकढी आणि भगर आमटी पण होती  आयोजक फारच कल्पक होते . तीन दिवस जिभेची नुसती चंगळ  झाली . 

           सारेगामापा च्या रात्री भार्गवी चिरमुले आणि उर्मिला कानेटकर यांचे क्लासिकल डान्स ठेवले होते ते अप्रतिम होते. सर्वच कार्यक्रम विचार पूर्वक ठेवलेले होते. त्यात युवक, लहान आणि मोठ्या व्यक्तींसाठी वेगवेगळे पोग्राम होते.
     

          दुसरे दिवशी संगीत मानापमान नाटक होते त्यातील सर्वच कलाकार कसदार अभिनय करीत होते, राहुल देशपांडे तर अभिनयाचा एक्काच.त्याने म्हटलेली नाट्य  गीते खूपच श्रवणीय होति. त्याचा शास्त्रीय संगीता वरचा प्रभाव तर दिसतच होता .
 


       नुपूर डान्स अकेडमी न्यू जर्सी यांचा नृत्य नाट्य अविष्कार खेळ मांडला  हा कार्यक्रम तर उत्कृष्टच  होता . मुले खूपच नृत्यात हुशार आणि तरबेज होति. त्यांनी वेस्टर्न आणि भारतीय पद्धतीचे दोन्ही पद्धतीचे डान्स खूपच अप्रतिम केले . अकादमी  च्या संचालिका तर खुपच सुंदर डान्स करीत होत्या .
                      

  



     त्याच रात्री सुप्रसिध्द संगीतकार अजय - अतुल यांचा कार्यक्रम होता, कार्यक्रमा ला एक तास उशीर झाला तर प्रेक्षकांनी थिएटर डोक्यावर घेतले आणि प्रोग्राम लवकर सुरु करण्यास भाग पाडले . त्या दोघांच्या मुलाखतीचा प्रोग्राम होता पण प्रेक्षकांनी त्यांना गाणी गाण्यास पण भाग पाडले . आता वाजले कि बारा, अप्सरा आली या गाण्याला तर लोकांनी डोक्यावरच घेतले आणि सर्वजन डान्स करायला लागले माहोल एकदम भारावून गेले. अजय अतुल यांना सार्थक झाले असे वाटले असेल.
  
        एव्हढे मोठे कलाकार होवून सुद्धा ते एकदम विनम्र होते. नटरंग ची गाणी आम्ही नाही केली ती आपोआप झाली असे त्यांनी सांगितले . जीवनात किती खडतर प्रसंग आले पण त्यातून तावून सुलाखून आले त्याची कहाणी कथन केली
       दुसर्या दिवशी वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचे सन्मान करण्यात आले. अश्विनी भावे हिच मेलांज हा शास्त्रीय संगीतावर आधारित कार्यक्रम झाला .

          आता निरोपाचा दिवस उगवला , निरोपाचा कार्यक्रम कसा आहे माहित नव्हते पण सर्वात कळस म्हणजे हा अप्रतिम कार्यक्रम होता त्यात महाराष्ट्र मधील  सुप्रसिध्द कलाकार होते. प्रत्येकाने आपापला पर्फार्मंस  खूपच उत्कृष्ट केला .

     सोनाली कुलकर्णीच्या अप्सरा आली या गाण्याला जशी दाद मिळाली तशीच दाद वैभव मंगले याने लता मंगेशकर च्या आवाजात म्हटलेल्या गाण्याला मिळाली सगळ्यांनी उभे राहून मानवंदना दिली . उमेश कामत, प्रिया बापट, भार्गवी चिरमुले, अभिजित खाण्डकेकर, आतिषा  नाईक ,वैभव मांगले ,अनिकेत विस्वास राव यांनी खूपच अप्रतिम नृत्ये केलि.

        एकूण सर्वच प्रोग्राम अप्रतिम झाला तसेच सर्व व्यवस्था अप्रतिम होती तसेच खाण्यापिण्याची पण चंगळ होति. त्यामुळं असा कार्यक्रम पुन्हा पुन्हा पाहायला आवडेल .

 
      त्याच दिवशी पद्मजा फेणाणी आणि अभिजित खांडकेकर याचा वाढदिवस असल्याने स्टेजवर दोघांना पुष्पगुच्छ देवून  तो सर्वांनी साजरा केला . अभिजित खांडकेकर याचे निवेदन उत्कृष्ट होते.
     
         एकूणच सर्व कार्यक्रमाचा निरोप घेताना हुरहूर वाटत होति. परत पुढच्या वेळी कार्यक्रमाला येण्याची आशा करून घरी परत आलो. सर्वाना त्यांनी चिवडा - लाडू, चाफ्याचे फुल, आणि कॅलेन्डर  दिले .                    
      असा कार्यक्रम पुन्हा पुन्हा पहावासा वाटेल . thanks बि.एम.एम.



























Sunday, February 17, 2013

Dwaraka Bhagwat Saptah

                 माझ्या आईचे गुरु श्री साधू महाराज कंधारकर यांनी या वर्षी श्री क्षेत्र द्वारका येथे भागवत सप्ताह ठेवला होता. आम्ही ४ फेब.ला द्वारका येथे पोचलो  ५ पासून साप्ताह सुरु होता. उद्घाटनासाठी करवीर पीठाचे जगत्गुरू श्री. शंकराचार्य आले होते. त्यांनी यशवंत महाराज यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे प्रकाशन केले तसेच सर्वाना अमोलिक शब्दात मार्गदर्शन केले. त्यांच्या रसाळ वाणीने त्यांनी  सर्वाना मंत्रमुग्ध केले. त्यांचे विचार ऐकण्यासाठी सर्वजन खूप उत्सुक होते. ते आल्या आल्या वातावरण एकदम भारावून गेले होते . २ तास कसे गेले कळले नाही.
        दररोजच्या कार्यक्रमाचा क्रम असा होता. सकाळी ७.३० ला विष्णू  सहस्त्रनाम पाठ, त्यानंतर साधू सुधा पारायण  ९ ते १० नाश्ता आणि त्यानंतर
१० ते २.०० किवा कधी  कधी २.३० किवा ३.०० पण वाजत असत. कारण भागवत कथा सांगणारे महाराज इतके सुंदर कथा सांगत कि, किती वेळ झाला कळतच नसे, त्यांना मला वाटते संपूर्ण भागवत ग्रंथच मुखोद्गत असावा.कुठल्या स्कंदात कुठल्या पानावर कोणता श्लोक आहे हे त्यांना तोंडपाठ होते. कथाकार
खूपच विद्वान होते. ते पाथर्डी जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत असे कळले.त्यांच्या  वाणीतून जसे काय ब्रम्हदेवच बोलत आहेत असे वाटत असे,त्यांचे नाव ह.भ.प.
जाटदेवळेकर असे होते, ते पाथर्डी तालुक्यात गोशाला चालवतात, त्यांचे हे काम खूपच महान आहे. त्याला भक्तांनी खूप छान प्रतिसाद दिला.
                                     
       द्वारकाधिश मंदिर तर खुपच  अप्रतिम होते हे मंदिर ५००० वर्ष जुने असून ते कृष्णाचा मुलगा प्रद्युम्न आणि नातू अनिरुद्ध यांनी बांधले आहे. हे मंदिर गोमती किनारी असून गोमती नदी इथेच सागराला मिळते, नदी आणि समुद्राचा  संगम तर इतके सुंदर ठिकाण आहे. मंदिर सर्व लाल दगडात बांधलेले असून त्यावर सुन्दर कोरीव आणि नाजूक नक्षीकाम केलेले आहे.पण क्यामेरा आत नेता येत नसल्याने फोटो काढता नाही येत याची खंत वाटते. कृष्ण याने
आपल्या अंताच्या वेळी सोन्याची द्वारका समुद्रात बुडविल्याने त्याचे काहीच
अवशेष राहिले नाही म्हणून प्रद्युम्न आणि अनिरुद्ध यांनी देवाचे आर्कीटेक्ट
           यांना बोलावून एका रात्रीत हे मंदिर बनवले आहे.  त्याचा  उंच कळस याची साक्ष देतो, कळसावर ध्वज दिवसातून पाच वेळा फडकतो. त्यासाठी २-२
वर्षे प्रतीक्षा यादी असते. आमचे नशीब बलवत्तर म्हणून आमच्या साधू महाराज संस्थेला त्यावेळी ध्वज चढवण्याचा मान मिळाला. ४० मीटर कापडाचा ध्वज असतो.
           
             ध्वज मंदिरात नेताना तो डोक्यावर मिरवत नेला आणि स्त्रिया आणि टाळकरी यांनी त्याची शहरातून भजन भजन करत मिरवणूक काढली, हा एक छान अनुभव होता.
           
            जसा जशी भागवत कथा पुढे जात होती तस तशी कथेत रंगत येत होती
कृष्ण जन्माच्या वेळी खरा वासुदेव आणि खरा छोटा कृष्ण केला आणि वसुदेवाने छोट्या कृष्णाला टोपलीत घालून डोक्यावर घेवून आणले.
            कृष्णाने सर्व सवंगडी आणि गोपिका यांना गोवर्धन पूजेसाठी नेले आणि तिथे देवानाही दुर्लभ असणारा काला केला, तो प्रसंग आम्ही गोवर्धन पर्वत तयार करून साजरा केला.  उत्तरोत्तर कथेत रंगत येत होती.
              त्यानंतर झाला कृष्ण आणि रुक्मिणीचा विवाह हा प्रसंग तर इतका रंगला कि श्रोते तल्लीन होवून ऐकत होते. खरा कृष्ण आणि खरी रुक्मिणी केली आणि सर्वाना अक्षता वाटून , मंगलाष्टक म्हणून विवाह साजरा झाला. विवाह
नंतर मिष्टान्न भोजन पण होते.
                      
                 दुसरे दिवशी सर्व महाराज यांची सर्व भक्तांनी मिळून ग्रंथ तुला केली. हा प्रसंग तर अवर्णनीयच होता. दर दिवशी उद्या काय आहे , उद्या काय आहे अशी उत्सुकता होती. सर्व महाराज यांच्या पत्नी यांची पण तुला केली गेली.
              दररोज कथा सांगताना मध्येच महाराज भजन करत राधे कृष्ण ,राधे कृष्ण मग तर काय लोक आपले वय विसरून लहान मोठे याचे भान न ठेवता उठून  तल्लीन होवून नाचायला लागत. सगळे बेभान होवून नाचत असत.
            
            भागवत कथेचे सात दिवस कसे संपले कळलेच नाही, अजून कथा पुढे चालावी असे वाटत होते.  मध्येच एक दिवस आम्ही बारा ज्योतीर्लिंग पैकी एक असे  सोरटी सोमनाथ येथे जावून आलो. वाटेत पोरबंदर येथे महात्मा गांधी यांचे घर आणि थोर कृष्ण भक्त सुदामा याचे घर बघितले. याच खोलीत गांधीजीचा जन्म झाला .
        गांधीजी यांचे घर भव्य असून ते अजून चांगल्या स्थितीत राखले आहे, तिथे  एका भागात कस्तुरबा गांधीजीच्या नावाने वाचनालय सुरु आहे. सुदामा
मंदिर पण छान आहे.
                                                   
         पुढे सोमनाथ येथे जुने आणि नवे अशी दोन मंदिरे आहेत. गझनीच्या महम्दाने  सोमनाथ  मंदिरावर ७२ वेळा स्वारी करून   मंदिर उध्वस्त करण्याचा   प्रयत्न केला. मंदिर भंग झाले म्हणून सरदार वल्लभ भाई पटेल
यांनी सध्याचे नवीन आणि अप्रतिम असे मंदिर बांधले.
            
                समुद्र काठी मंदिर असून तिथे लाईट आणि साऊंड शो दाखविला जातो. सभोवती सुंदर बाग आहे.
          मुख्य  द्वारके पासून  काही अंतरावर बेट  द्वारका आहे, तिथे बोटीतून
जावे लागते.  बोटीतून जाताना सीगल हे पक्षी समुद्र वरून मुक्तपणे विहार करत होते. मोठ्या बोटीतून जाताना भक्त द्वारकाधीश भगवान कि जय असा जयघोष करत होते.
        तिथे पण भगवान श्री कृष्णाचे मंदिर जुने होते ते आता परत नवीन बांधत आहेत.   वाटेत आणखी एक ज्योर्तीलिंग  नागेश्वर  होते त्याचेही दर्शन घेतले.
      कृष्णाने जिथे गोपी सोबत आंघोळ केलि आणि गोपींची वस्त्रे पळविली तो गोपी तलाव बघितला. तेथील माती गोपी चंदन म्हणून कपाळाला लावतात.
            रुक्मिणी आणि कृष्णाला दुर्वास ऋषि नि शाप दिला म्हणून दोघांचा बारा वर्षे विरह होता, त्यामुळे रुक्मिणी मंदिर गावापासून १ कि.मी. अंतरावर आहे. ते सुद्धा अप्रतिम आहे.
          एकूणच हा भागवत सप्ताह अविस्मरणीय होता. संयोजकाचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. कारण त्यांचे संयोजन खूपच छान होते. १२०० लोकाना ८ दिवस  २ वेळा जेवण, एक वेळ नाश्ता  आणि दोन वेळा चहा अगदी शिस्तीत मिळत होता. कशालाही कमी नव्हते. तसेच खूप लोकांनी रात्रंदिवस
कष्ट केले म्हणून हा कार्यक्रम यशस्वी झाला.  असाच दरवर्षी आम्हाला सुवर्ण योग यावा आणि त्यांचे बरोबर आम्हालाही थोडी सेवा घडावी हि ईश्वर  चरणी प्रार्थना आहे.                        
                                              
                  
          एका भक्ताने काढलेली सुंदर रांगोळी . सुदामा कृष्ण भेट तर एव्हढी रंगली कि सर्वांच्या डोळ्यात अश्रू आले.