Thursday, October 3, 2013

BAR HARBOR




          साउथ विंडसर पासून अंदाजे ४०० मैल अंतरावर उत्तरेकडे कॅनडा बोर्डर जवळ असणाऱ्या बार हार्बर या ठिकाणी आम्ही गेलो होतो. इथून ६ तास प्रवासासाठी लागले . रस्ता तर खुपच सुंदर होता.


       तिथे पोचल्या पोचल्या आधी बीच mountain वर गेलो. खालून वर पोचन्या साठी ,। .' ७ मैल जावे लागले, चढण सगळी दगडाचीच होती, मोठ मोठे दगड आणि ते सरळ रेषेत उभे असे सर्व चढून आम्ही गेलो. रॉक क्लायम्बिंग करून गेलो. छोटा जय सुद्धा न थकता वर चढला . मी ही आयुष्यात पहिल्यांदाच  एव्हढी खडतर वाट चढले पण न थकता चढले .
 

       वर गेल्या गेल्या जे विहंगम दृश्य दिसले त्याने थकवा कुठल्या कुठे पळून गेल. चारही बाजूने हिरवे कच्च डोंगर ,एका बाजूला समुद्र त्यात छोटे छोटे आयर्लंड आणि छोटी छोटी दिसणारी घरे हे विहंगम दृश्य पाहून भान हरपले . चारी दिशेला हेच दृश्य त्यामुळे कुठे पाहावे आणि कुठे नाही हे समजत नव्हते. अर्धा तास थांबलो तरीही तिथून हलावेसे वाटत नव्हते. फोटो काढून  ते दृष्य  डोळ्यात साठवून ठेवले 


          आणि दुसर्या वाटेने परत निघलो. हा रस्ता तर अजूनच सुंदर होता.  इकडे वेगळेच  दृश्य  होते. मोठ मोठी सरोवरे ,त्या भोवती हिरवी हिरवी झाडे आणि डोंगर, वरून जाणारे खाली उतरतील असे वाटणारे ढग अप्रतिम दृश्य होते.



     उतरणारा रस्ता पण दगड धोंडे आणि खाच खळगे यांचाच होत.
पण एव्हढी यातायात करून वर गेलो ते खूप चांगले झाले. दृश्य डोळ्यात साठवून ठेवण्य सारखेच होते.

  
       तिथून समुद्रावर लाईट हाउस पाहण्यासाठी गेलो आणि सुंदर सूर्यास्त देखील बघितला .



      रात्री रिसोर्ट वर आलो तर काळोख होता, सकाळी उठून काचेतून बाहेर बघितले तर एकदम आश्चर्यच वाटले कारण बाहेर सुंदर पौंड होता आणि त्यात सुंदर बदके पोहत होती,. सगळीकडे हिरवळ आणि लाल पानाची झाडे अप्रतिम दृश्य होते.

         राम ,जय आणि श्रीकांत यांनी तर मस्त बोटिंग केले, आणि जय,राम यांनी बदकांना खायला देवून एन्जॉय केले.





           सगळीकडे हिरवळ आणि हिरवळ खुपच छान वाटत होते.नास्ता उरकून ११ वाजता कॅडीलक mountain वर निघलो. रस्ता तर इतका गुळगुळीत होता कि गालीचा वरून चाललो आहोत असे वाटत होते. रस्ता खूपच देखणा  होता .दोन्हि बाजूला मोठ मोठ्या झाडांची कमान होती आणि त्यात नागमोडी वळणे घेणारा रस्ता बापरे काय छान वाटत होते.
 



             एक चढण चढलो आणि सर्वांनी ओहो असे उद्गार काढले कारण समोर तसे अप्रतिम दृश्य होते. एका बाजूला प्रचंड पाणीच पाणी, दुसरीकडे हिरवे हिरवे मखमल पसरलेले डोंगर,त्यावर हळुवार चालणारे ढग,तसेच आकाशात सुद्धा नुसती ढगांची गर्दी झाली होति.






                  ते पाहून बालकवींची कविता आठवली, हिरवे हिरवे  गार गालिचे हरित तृणाच्या मखमलिचे.अहाहा काय म्हणून वर्णन करवे. स्वर्गात आहोत असेच वाटत होते.





          रस्त्यात उतरून फोटो काढत होतो तर मागे इतके ढग आले कि आम्ही जणू काय ढगातून विहार करत आहोत.



         जस जसे वर जाऊ तास तसे धुक्याची शाल पांघरून डोंगर बसलाय असे वाटत होते. धुके गडद गडद झाले आणि हवा पण बोचरी झलि. तिथे थांबावेसे वाटेना, काही वेळाने धुके थोडे कमी झाले आणि खालील स्वर्गीय दृश्य पाहून थक्क झालो. खाली एक गाव होते, छोटी  छोटी घरे,समुद्र त्यात छोटीछोटी  शिडाची जहाजे आणि ठळक दिसणारे तीन आयर्लंड  अहाहा काय सुंदर देखावा होता तो.


      जणू काय स्वर्गात आल्या सारखेच वाटत होते कितीही डोळ्यात साठवून ठेवले तरी मन भरत नव्हते. ते निसर्ग सौंदर्य इतके विलक्षण होते कि कितीही पहिले तरी समाधान होत नव्हते .


           ते सर्व क्यामेर्यात बंदिस्त होणे शक्य नव्हते, तिथे एक ट्रेल होता तो पण पोर आणि प्रीती, श्रीकांत यांनी तो घेतला, पोर बिलकुल दमली नाहीत .


            त्यानंतर डाऊन टाऊन ला गेलो तिथे छान फ्रेश पिझ्झा खाल्ला, आणि  शेजारीच असलेल्या बार हार्बर बंदरावर गेलो. डाऊन टाऊन देखील एकदम देखणे होते, छोटी छोटी मस्त दुकाने होती, त्यात एखाद दुसरे गिर्हाईक खरेदी करत असायचे .



        काठावर सुंदर सुंदर हॉटेल्स तसेच सुंदर सुंदर बागा होत्य. सगळीकडे हिरवळ होती तसेच शिडाच्या मोठ्या नवा तसेच एक मोठे शिप पण होते. तसेच मगाशी आम्ही कडीलक mountain  वरून बघितलेले तीन आयर्लंड देखील होते.  इथेही समुद्राच्या काठा काठाने एक सुंदर ट्रेल होत.
 



       हार्बर वरती एक छान लाकडी पूल होता त्यावर सुंदर सुंदर फुलांच्या कुंड्या ठेवलेल्या होत्या त्या समुद्राच्या पार्श्व भूमीवर उठून दिसत होत्या .





         तिथून हुटर point ला गेलो तिथे तर सगळीकडे पाणीच पाणी असा आथांग समुद्र होता . पाणी क्षितिजाला टेकले होते. ते पाहून आपण किती लहान तोकडे आहोत याची जाणीव होत होति.


              हूटर  point ला स्टार फिश मिळतात असे कळले पण आमची निराशा झालि. 
     

          समुद्राच्या कडेकडेने इतका सुंदर गुळगुळीत रस्ता होता कि कितीही फिरून मन भरत नव्हते. तिथून जोर्डन point ला गेलो तिथे धुके असल्याने काही पाहता आले नाही पण सुंदर बाग बघितलि. तसेच छान रेस्तारंत पण होते.

                अशा तर्हेने आमची हि बार हार्बर ट्रिप खूपच सही आणि सुंदर झालि. एकदा तरी बर हार्बर ची ट्रिप करावीच असे हे ठिकाण आहे.