Saturday, March 8, 2014

अमेझिंग न्यूझीलंड

        आम्ही १८ मार्च ते २८ मार्च केसरी सोबत न्यूझीलंडच्या ट्रीपसाठी गेलो. प्रथम सिंगापूर ,तिथून सिडनी आणि मग ऑकलंड असे एकूण आम्हाला १८ तास विमानाने लागले,
        वरील एअरपोर्ट हा मुंबई चा नवीन झालेला खूपच सुंदर असा आहे. परदेशातील एअर पोर्टशी त्याची आता तुलना होवू शकते.   
     ऑकलंड एअरपोर्ट  हा काही फार मोठा नाही पण ठीक आहे. संपूर्ण न्युझीलंड
ची लोकसंख्या फक्त ४५ लाख आहे,त्यातील १३ लाख लोक ऑकलंड येथे राहतात. येथून साऊथ पोल फक्त १३०० कि.मी.वर आहे आणि तिथे जाण्यासाठी न्युझीलंड आणि अमेरिका यांच्या संयुक्त  विद्यमाने इंटरन्याशनल  antarctika सेंटर तयार केले आहे. विमान ढगावरून जाताना असे वाटत होते कि आपण स्वर्गातून जात आहोत.ढगांचे दाट थर पसरलेले होते .
       
           
      ऑकलंड वरून २०० कि.मी.वर  असलेल्या rotorua या ठिकाणी आम्ही दुसरे दिवशी गेलो. जाताना वाटेत वैटामु केव्हजला गेलो या केव्ह्ज जमिनीच्या खाली आहेत आणि तेथील साऊनड सिस्टीम हि डॉल्बी सारखी आहे. त्यामुळे तिथे आवाज घुमतो सगळे आपापली राष्ट्रगीते म्हणतात आम्ही आपले जन गण मन हे राष्ट्रगीत म्हणले तेव्हा उर अभिमानाने भरून आला. त्या केव्हज च्या खाली पाणी आहे त्यात बोटीने जायचे तिथे संपूर्ण अंधार आहे तसेच हळू हळू बोटीत बसायचे आणि नावाडी बोट अंधारातच चालवितो आणि त्यातून जाताना एक अद्भुत दृश्य आपल्याला दिसते असे वाटते कि, आपण आकाशाच्या खालून जात आहोत आणि आकाशात हजारो चांदण्या चमचम करत आहेत, आपण थोडा देखील आवाज करायचा नाही कारण तिथे छताला काजवे  लटकलेले असतात आणि ते आवाज केला तर उडून जातील , मस्त पैकी चांदण्या रात्री आपण फिरत आहोत असे वाटते. हा एक अप्रतिम अनुभव होता. २० मिनिटाने बाहेर आल्यावर आपण भानावर येतो.याठिकाणी पंडित रविशंकर यांच्या गाण्याचा कार्यक्रम झाला असे कळले.
            
      आम्हाला न्यूझीलंड येथे सगळ्या ठिकाणी भारतीय पद्धतीचे जेवण अगदी पापड,लोणची पासून साग्रसंगीत मिळाले. न्यूझीलंड ची राजधानी वेलिंग्टन आहे पण सरकारी कारभार सगळा ऑकलंड येथून चालतो, तसेच येथे मौरी हे आदिवासी लोक आहेत, तसेच येथे मेंढ्याची पैदास खूप असल्याने येथे लोकर खूप अप्रतिम प्रतीची तयार होते.  तसेच दुग्धजन्य पदार्थ पण तयार होतात किंबहुना हेच दोन येथील मुख्य व्यवसाय आहेत. वाटेत आम्ही मौरी विलेज येथे मौरी डान्स बघितला.
        
     त्याच  वाखारेवारेवा विलेज मध्ये थर्मल रिझर्व एरिया आहे तो १२० हजार वर्षे जुना आहे, तिथे काही भागात गरम पाण्याचे उंच कारंजे उडत असते आणि चिखल पण खदखदत असतो तसेच संपूर्ण गावात देखील जागोजागी  असेच पाण्याचे कारंजे आणि चिखल खदखदत असतो. सगळीकडे गंधकाचा वास येतो.
     
           दुपारी आराम करून संघ्याकाळी आम्ही फिरत फिरत गार्डन मध्ये गेलो   तिथे एक सुंदर म्युझियम होते पण बंद असल्याने आम्ही बाहेरून बघितले   येथील व्यवहार सगळे साधारण ६ वाजताच बंद होतात .
           
 
       इथून दुसरे दिवशी आम्ही अग्रोडोम येथे शिप शो बघितला . अंगावर भरपूर लोकर असलेल्या आणि थोडे फार प्रशिक्षण दिलेल्या मेंढ्याचा शो होता तो शो सादर करणारा माणूस खूपच बोलघेवडा होता तो सगळ्यांना आपल्या शो मध्ये सामील करून स्टेजवर बोलवत होता, एकेका देशाचे नाव घेतले कि त्या त्या देशाचे लोक हात वर करून जल्लोष करत असत. त्याने ५ मिनिटात लोकर मेंढ्याच्या अंगावरून काढली आणि प्रेक्षकात वाटून टाकली .

             एका भारतीय हॉटेल मध्ये तेंडूलकरचे ज्याकेट लावलेले होते आणि त्यावर संदेश लिहिलेला होता तेव्हा किती छान वाटले म्हणून सांगू, उर अभिमानाने भरून आला.
         

             तिथून आम्ही परत ऑकलंड ला आलो तिथे स्काय टोवर वरून शहराचे विहंगम दृश्य दिसले.तसेच केली टार्ल्टन नावाचे अंडर वाटर वर्ल्ड छान होते .
       
        आम्ही ऑकलंड वरून विमानाने क्विन्स टाऊन येथे गेलो तेथील एअरपोर्ट तर डोंगराच्या कुशीत आणि सुंदर अशा ठिकाणी आहे .समोरच सुंदर निळ्याशार
पाण्याचा vakatipu लेक आहे. मला वाटते न्यूझीलंड हा देश लेकचाच म्हणून ओळखला जात असावा .

                     
    क़्विन्सटाऊन हे vakatipu लेकच्या काठावर वसलेले एक टुमदार शहर आहे, इथे सुंदर सुंदर हॉटेल्स आहेत, छान छान घरे आहेत आणि आमच्या हॉटेल मधून बाल्कनीतून आम्हाला हा अतीव देखना लेक दिसत होता सकाळी उठले कि लेक बघ, रात्री चांदण्यात लेक बघ असे चालले होते.तिथे आम्ही गंडोला राईड घेतली वर गेल्यावर सगळ्यांनी एकदम आहा आहा असे उद्गार काढले कारण
समोरील दृश्यच तसे होते, समोर निळेशार पाणी,दोनही बाजूला हिरवे हिरवे डोंगर त्यावरून जाणारे शुभ्र ढग  आणि खाली छोटी छोटी सुबक देखणी घरे अहाहा काय वर्णन करावे शब्दच अपुरे पडले, असे ते स्वर्गीय दृश्य होते .
                 
      तिथे आम्ही बंजी जंप, तसेच arrotown म्युझियम बघितले आणि जेट बोट राईड घेतली . बंजी जंप म्हणजे नदीवरच्या पुलावरून दोरी कमरेला बांधून नदीत उलट्या बाजूने उडी मारणे ,खाली येताना गोल गोल फिरवतात आणि खाली  गेल्यानंतर एक बोट आपल्याला घेवून जाते.
               

         जेट बोट तो इतक्या fast चालवीत होता कि,आम्ही सगळे ओरडत होतो , थोड्या थोड्या वेळाने तो बोट  ६० अंशाच्या कोनात फिरवत असे.त्यापूर्वी तो आपला हात वर करून गोल फिरवत असे कि,आम्ही समजायचे तो बोट फिरवीत आहे म्हणून . बोट गिर्कन फिरली कि आम्ही ओरडायचो मस्त राईड होती .
                   

     त्यानंतर  आम्ही vakatipu लेकवर फिरायला गेलो खूप छान हवा होती तिथे पण एन्जॉय केले. छोटीशी पण सुबक अशी सुंदर बाजारपेठ होती .
                   
           क़्विन्सटाऊन  हे इतके देखणे शहर होते कि, तीन दिवस राहिलो तरी मन भरले नाही . तेथून ३०० कि.मी. अंतरावर milford sound हे ठिकाण होते.
आम्ही कोचने सकाळीच निघालो सूर्याचे कोवळे किरण लेक वर पडले होते. डोंगराच्या कडा किरणात चमकत होत्या . सगळीकडे प्रफुल्लीत वातावरण होते.
हा संपूर्ण रस्ता तर खूपच छान होता .
         
      सम्पूर्ण रस्ता इतका सुंदर होता कि कुठे फोटो काढू अन कुठे नाही असे होत होते .   रस्त्यात फिजीओर्द न्याशनल पार्क होते तिथे पण खूप छान हवा होती .
             
        मिरर लेक मध्ये डोंगराची छाया पडते हि पण कल्पना छान होती . वाटेत आम्हाला पाऊस लागल्याने छोटे छोटे धबधबे तयार झाले होते एकदम बढीया वातावरण होते जणू काय निसर्ग आम्हाला आपली वेगवेगळी रूपे दाखवत होता.
                 

          जगात जी महत्वाची १० ठिकाणे आहेत त्यात milford sound हे ठिकाण  दुसर्या स्थानावर आहे  , निसर्गाने न्यूझीलंड या देशाला सुंदरतेचे वरदान दिले आहे .
         
     
       समुद्राचे आत घुसलेले पाणी आजूबाजूला हिरवेगार डोंगर,त्यावरून वाह्नारे ओघळ ,वरून जाणारे ढग ,पर्वतावरील बर्फ अशी हि क्रुझ राईड होती आम्हाला जेवण पण भारतीय होते, हा लेक टास्मान समुद्राला जावून मिळतो. एका माणसाचे नाव milford होते त्यावरून हे नाव पडले. त्याची अखेरची इच्छा होती कि, त्याला हे ठिकाण पाहायला मिळावे, सर्वात सुंदर असे हे ठिकाण होते .क्रुझ च्या डेकवरून आजूबाजूला नजर ठरत नव्हती कुठे बघावे काही कळत नव्हते


         वाटेत जाताना सुद्धा सुंदर सुंदर नजारे होते, हिरव्या गवतावर चरणाऱ्या
पांढर्या शुभ्र गुबगुबीत मेंढ्या ,कुठे उघडे बोडके डोंगर त्यांची  पण  वेगळीच शोभा होते .एक मिनिट सुद्धा डोळे मिटू नयेत असे वाटे .
           

         वाटेत लागलेला अन्नावू लेक हा वेगळेच रूप घेतलेला होता, कुठे डोंगरावर ढग,कुठे धुके, कुठे पांढरा शुभ्र बर्फ असे सारखे चालले होते .ढगाचा पाठ शिवणीचा खेळ चालू होता .
           
           
       येथील राष्ट्रीय पक्षी किवी आणि सिल्व्हर लीफ  हे आहे .तसेच चास्म वाटर फाल हा पण सुंदर होता .
   

     
           आम्ही क्रुजने एका वाटर फालच्या खाली गेलो तेव्हा तर अंगावर पाण्याचे तुशार  उडले आणि आम्ही चिंब भिजलो हि राईड कधीच संपू नये असे वाटत होते .
             

 
          तिथून आम्ही chraistchurch ला गेलो वाटेत पझल वर्ल्ड वान्नाक्का येथे होते , ते बघितले तिथे सगळ्या उलट गोष्टी होत्या . पाणी खालून वर जात होते, आपण हवेत उलटे होत होतो, नामवंत नेत्यांचे चेहरे एका रूम मध्ये लावले होते ते आपण फिरु  त्या दिशेला तोंड फिरवत आहेत असा  भास होत असे. असे अनेक जादुई प्रकार होते  ४ डी पिक्चर पण होते .            
     तिथे भूलभुलैया पण होते माणूस त्यात हरवून गेला कि,तासभर वाट सापडत नसे .

            माउंट कुक वर हेलिकॉप्टर राईड हा चित्त थरारक अनुभव होता , एका हेलिकॉप्टर मध्ये सहा माणसे गेलो, तो कप्तान आम्हाला विविध माहिती सांगत होता , जास्त बर्फ नव्हता पण त्यात खेळलो खूप मजा केली हि राईड ४० मिनिटाची होती त्यासाठी ३५० डॉलर घेतले गेले . बर्फाच्या डोंगर वरून जाताना खूप सही वाटत होते एक उत्सुकता होती  ती पूर्ण झाली .

                        त्यानंतर एक स्वर्गीय अनुभूती आम्हाला मिळाली आम्ही आ वासून बघतच राहिलो कारण समोरील दृश्यच  तसे होते , निळेशार पाणी, त्यावर चमकणारे सूर्य किरण त्यामागे बर्फाचा डोंगर आणि दोनही बाजूला हिरवे डोंगर बाजूला हिरवीगार सुचीपर्णी झाडे एखाद्या चित्रातील दृश्य पाहत आहोत असे वाटले समोर अप्रतिम असा पुक्काकी लेक होता आम्ही गर्भगळीत झालो .  तोंडातून शब्दच निघत नव्हते आ वासून बघतच राहिलो . काय निसर्गाची किमया आहे काही कळत नव्हते .यानंतर जगात काही सुंदर असेल असे वाटत नाही, अजून काही बघण्याची ईच्छाच नव्हती .

                      ह्रद्याच्या कप्प्यात साठवून ठेवावे आणि ते कधीच बाहेर काढू नये असे ते क्षण होते .

       शेतात पाणी देण्यासाठी वेगळ्या प्रकारचे स्प्रिंकलर हिरवेगार असे
मेलोनमैल  पसरलेले वायनरी शेती आणि सलाड तसेच कोबीची शेते काय अवर्णनीय देखावे होते तसेच डोंगर तर इतके वेगवेगळे होते कि काय सांगावे .
       त्यानंतर आला लेक tekapu तो पण आधीच्या तोडीस तोड होता किती फोटो काढावे कळत नव्हते .

      न्यूझीलंड हा देश लेक चा देश म्हनुनच ओळखला जातो .
     आम्हाला हा सुंदर प्रवास कधी संपूच नये असे वाटत होते . 
           संध्याकाळी ७ वाजता christchurch येथे पोचलो . दुसरे दिवशी येथील इंटर national अंटार्क्टिका सेंटर बघायला गेलो . त्यात तेथील जीवन तिथे वीज कशी नेली, लोक कसे राहतात ते सगळे video क्लिप द्वारे तसेच मोठ्या स्क्रीन वर मुव्ही तयार करून सुंदर प्रकारे सादर केले आहे .

                                    तिथे रिसर्च साठी गेलेले लोक कसे राहतात, तसेच तिथे जाण्यासाठी काय तयारी करावी लागते याच्या फिल्म आहेत तसेच उणे ८० डिग्री तापमानात गेल्यावर काय फील होईल ते एका खोलीत नेवून तितके तापमान सुरु करून आपल्याला फील देतात तेव्हा तर आपण मरू कि काय असे वाटते इतके तिथे थंड असते . आपल्याला storm चा फील देतात .साऊथ पोल वरील स्थिती हे पण दाखवले आहे खरच हे एकदा जरूर पाहण्या सारखे आहे .

       बोटानिकल गार्डन, मोना व्हाले गार्डन जे avon नदीवर आहे तसेच म्युझियम  पण खूप छान होते . तसेच अंटार्क्टिका सेंटर येथे पेंग्विन होते ते दुडूदुडू  चालत होते ते बघून मजा येत होती.
            मोना व्हाले गार्डन मध्ये रोज गार्डन पण होते ते पण अप्रतिम होते .

        मला न्यूझीलंड मधील पहिली गोष्ट आवडली तो लेक पुक्काकी,त्यानंतर लेक टेकपू ,त्यानंतर milford sound  आणि सर्वात शेवटी बाकीची ठिकाणे पण
एकूणच सर्वच देश खूप सुंदर आणि देखणं आहे तसेच निसर्गाचे या देशावर वरदान आहे.  एकदा जरूर इथे जावे आणि आपल्या जीवनाचे सार्थक झाल्या सारखे समजावे .