आम्ही प्रथम विंडसर पासून २५० मैलावर असलेल्या finger lakes area ला गेलो, जे पाच lake हाताच्या पंजाच्या आकाराचे आहेत ,जशी पाच बोटे पसरलेली आहेत म्हणून त्यांना finger lake म्हणतात.
तिथे वॉटर taughannock falls ला गेलो, रस्ता खूप सुंदर होता दोन्ही बाजुला हिरव्या झाडांचे हिरवे हिरवे डोंगर होते, वातावरण खूप आल्हाददायक होते.
दोन हिरव्या हिरव्या डोंगराच्या कुशीत सुंदरसा धबधबा बघताना भान हरपून गेले, आम्ही सर्वजन मिळून दहा लोक होतो, त्यामुळे खुपच धमाल आली. सुंदर आणि अवाढव्य अशा kayuga lake वर सर्वानी पाण्यात जावून खूप मौज केली, जेवण केले.
ह्या भागात बऱ्याच वायनरीज आहेत, आम्ही या भागात प्रसिध्द असलेल्या Lamoraux वायनरीज पाहण्यास गेलो.
वायनरीज बघून २ तास ड्राईव्ह करून Selkirk state पार्क येथे कॅम्पिंग साठी गेलो. जंगल खूप घनदाट आणि सुंदर होते, वळणाच्या वाटा, एक lake ओंटारिओ भव्य पसरलेला होता, एखादा समुद्र असल्याचा भास होत होता. लाटा पण समुद्रा सारख्याच होत्या.
आम्ही तेथे आत्ता पर्यंत कधीही पहिला नाही असा खूप सुंदर सूर्यास्त बघितला अक्षरशः डोळ्याचे पारणे फिटले. जणू धरतीवर आणि क्षितिजावर गुलाल पसरला आहे. सूर्य आकाशात असताना ते सूर्य पाण्यात हळू हळू डुबताना पाहणे हा एक खूप अवर्णनीय अनुभव होय. मन भरून ते दृश्य आम्ही डोळ्यात आणि हृदयात साठवून ठेवले.
आणि आमचा केबिन मधील जंगल वास सुरू झाला, आम्ही घरात जे जे पदार्थ करतो ते ते पदार्थ तिथे अपुऱ्या सामग्रीनिशी करून खाल्ले, ते पण १० लोकांसाठी fire प्लेस वर बटाटे, रताळी, कनसे, marshmelo सर्व काही भाजून खाल्ले, पत्ते खेळले तसेच जय ने पण पत्ते खेळले. आमचे केबिन हे सेलकिर्क स्टेट पार्क येथे होते.
दुसरे दिवशी सकाळी लवकर निघून १ तासाच्या अंतरावर alecxandria या गावात गेलो हे गाव Saint Lawrence नदीच्या काठावर वसलेले आहे, गाव खूप मोहक होते, छोटेसे downtown त्यामधून फेरफटका मारायला मस्त मजा आली. तिथेच uncal sam boat tour ने आम्ही thousand island ची टूर घेतली जी दोन्ही देशातून जाते, bridge ओलांडला की त्याच्या पलीकडे कॅनडा हा देश आहे पण आपल्याला तिकडे जाण्यासाठी व्हिसा लागत नाही पण आपण कॅनडातून चक्कर मारू शकतो .
खूप वर्ष पूर्वी तिथे ग्लेशियर्स होते त्याचे पाणी वितळून नदी बनली आणि छोट्या छोट्या डोंगराचे टोक म्हणजे हे छोटे छोटे आयलंड आहेत असे येथील लोक सांगतात .
तीच ही नदी Saint Lawrense.
आम्हाला बोटीत बसल्या पासून इतकी सुंदर सुंदर व्हिलाज, सुंदर आणि आकर्षक घरे पाहायला मिळत होती, बोटीच्या दोन्ही बाजूने बघण्या साठी धावपळ करावी लागत होती . दोन्ही बाजूने नजर ठरणार नाही असे पॅलेसच म्हणा दिसत होती, प्रत्येक घराच्या बाजूला बोटींसाठी गॅरेज, आकर्षक फुलांच्या कुंड्या आणि बरेच काही दिसत होते.
प्रत्येक विला पाहण्या सारखा होत. असे एकूण छोटे छोटे हजार पेक्षा जास्त आयलंड आहेत म्हणे. एक एका घराची किंमत कित्येक million dollars आहे असे ती guide सांगत होती.
ब्रिज ओलांडून पलीकडे गेले की ,कॅनडा हा देश सुरू होतो पण तिथे व्हिसा लागत नाही ,त्या साईड ला तर अजूनच आकर्षक व्हिलाज होते ,त्या लोकांचे life बघून आश्चर्य वाटत होते , रात्रंदिवस पाण्यातच ,कुठे जायचे तरी निघाले बोट वल्हवत ,कार किंवा बाईक च्या ऐवजी बोट घ्यायची आणि जायचे बाहेर किती छान जगणे .
येताना वाटेत boldt नावाच्या माणसाने बांधलेला castle होता तिथे थांबलो. Castle फारच आकर्षक होता.
73 वर्ष तो पडीक अवस्थेत होता, boldt याची बायको आजारी होती त्यामुळे त्याचे दुर्लक्ष झाले. अचानक त्याला आठवण झाली आणि त्याने बायकोच्या स्मरणार्थ हजारो डॉलर्स खर्चून बांधकाम केले.
आतील सजावट तर अगदी आकर्षक आणि सुंदर होती, किचन तर पूर्वीच्या काळचे पण अतिशय देखणे होते. हे त्यांचे डायनिंग रूम. राजे लोक कसे शाही पद्धतीने जगतात याची एक झलक होती.
प्रत्येक वस्तू अतिशय किमती आणि देखणी होती, प्रत्येकाचे बेडरूम वेगवेगळ्या पद्धतीने सजवलेले होते. जागोजागी आकर्षक पेंटिंग लावलेली होती. फर्निचर तर अप्रतिमच होते.
कितीही वेळा बघितले तरी मन भरणार नाही अशा पद्धतीने रचना केलेली होती. दिवसभर आम्ही सगळे त्या आयलंड वरतीच होतो.
४ जुलै हा अमेरिकेचा स्वातंत्र्य दिवस आहे.

रात्री स्वातंत्र्य दिन निमित्त आकर्षक फटाक्याची रोषणाई castle वर आयोजित केलेली होती. रोषणाई अप्रतिम होती. रात्री १२ वाजता आम्ही selkirk स्टेट पार्क येथे केबिन मध्ये परत आलो. आमची ८ दिवसाची ट्रीप ही संपूर्ण जंगल सफारीच म्हणजे जंगलातच वास्तव्य होते.
पुढील मुक्काम संपूर्ण घनदाट जंगल आणि तंबू मध्ये होता. या ठिकाणाहून letchworth पार्क २ तासाच्या अंतरावर होते. हा रस्ता पण खूपच सुंदर होता.
आम्हाला घनदाट झाडीने वेढलेल्या गोलाकार जागेत तम्बू लावायचा होता. गेल्या गेल्या आम्ही तंबू लावायची तयारी केली तो पंपाने फुगवून जमिनीत खिळे ठोकले आणि त्याला मजबूत केले, त्या ठिकाणी एक इलेकट्रीक चे कनेक्शन दिलेले होते त्यामुळं आम्हाला शेगडी वापरून जेवण बनवणे शक्य झाले . दोन रात्र दोन दिवस आम्ही संपूर्ण जंगलात होतो. फोन इंटरनेट वगैरे सर्व बंद होते, सर्व जगाशी संपर्कच नव्हता. एका दृष्टीने बरे वाटले. शांतपणे जीवन जगणे काय असते याचा सुंदर अनुभव आला .
कसलेही इलेकट्रोनिक साधन नसताना आपण जगू शकतो याचा शोध लागला. कसलीही काळजी नाही. कोणाचा फोन नाही, टीव्ही नाही एकमेकांशी भरपूर संवाद होतोय किती छान अनुभव होता. एकमेकांना भरपूर वेळ देतोय, मुले मुक्तपणे बागडतायत काय छान स्वप्न कल्पना आहे नाही.
जीवनात असा अधून मधून स्वतः ला वेळ द्यावा माणसाने आणि स्वच्छंद जगावे याची मजा काही औरच स्वतः बद्दल जरा आत्म चिंतन करता येते. आमच्या तंबू ला वरून जाळी होती त्यामुळं झोपल्या जागेवरून चंद्र तारे दिसत होते, झोपल्या झोपल्या चांदण्या आम्ही मोजल्या. खूपच छान कवी कल्पना वाटत होती, भोवती घनदाट जंगल आणि आपण आकाशाकडे तोंड करून शांत चंद्र तारे निरखत आहोत. अहाहा काय सुंदर.
आम्ही शेगडीवर काय काय नाही बनवले पास्ता सुद्धा बनवला. ही सफर पुन्हा पुन्हा अनुभवावी अशीच होती, त्यातच दोन्ही ही रात्री जंगलातील प्राणी ज्याला रॅकून म्हणतात तो वारंवार आमच्या तंबू जवळ येत होता त्यामुळं अजूनच मनात धाकधूक वाटत होती. पण एकूण अनुभव छानच होता.
आम्ही दुसरे दिवशी Letchworth स्टेट पार्क मध्ये फिरलो एकूण एरिया शेकडो मैलांचा आहे ,खोल दरी आहे ती पण मैलोन मैल आहे. याला दक्षिणे कडील grand caniyan असे म्हणतात. बेसॉल्ट चे खडक एकावर एक असे थर आहेत, तसेच small, middle आणि upper असे तीन fall आहेत, पण उन्हाळ्यामुळे पाणी खूप कमी होते, नाही तर सर्व जण व्हाईट वॉटर राफ्टिंग करणार होते.
पूर्ण letchworth पार्क फिरण्यासाठी एक दिवस पुरणार नव्हता.
पोरांनी पाण्यात खूप धमाल केली.
प्ले एरिया मध्ये जय आणि राम ने खूपच एंजॉय केले.
संपूर्ण दिवस आम्ही पुरे पार्क पालथे घातले , तिथे मला एक अमेरिकन friend मिळाली ,ती खूप बोलकी आणि छान होती. थोड्याच वेळात आमची छान गट्टी जमली आम्ही एकमेकांचे email आयडी घेतले. ती इंडिया मध्ये येते म्हणाली आमची छान मैत्री जमली, दुसरे दिवशी मला मुद्दाम भेटायला तंबू मध्ये आली. मला खूप छान वाटले. ती फ्लोरिडा वरून आरव्ही ने आली होती, तिने चार स्टेट पार्क केले होते. शाळेत टीचर आहे म्हणाली.
आमचा आता जंगलाचा मुक्काम संपत आला होता .कारण २ रात्र आणि २ दिवस झाले आम्हाला इथे येऊन आम्ही दुसरे दिवशी परत selkirk state पार्क मधील केबिन मध्ये जाण्यासाठी निघालो .
आम्ही जो रस्ता निवडला तो फारच scenic होता. सगळीकडे हिरवी हिरवीगार शेतं जणू काय धरती हिरवा शालू नेसली आहे. काही शेते पिवळी होती ते गव्हाचे पीक होते, कुठे हिरवे तर कुठे पिवळे वा काय अप्रतिम दृश्य होते.
हिरव्या शालूला जणू काय पिवळा पदर अहाहा काय वर्णावे. एखाद्या सिनेमाचे शूटिंग करावे असे लोकेशन होते, तिथून हलण्याची इच्छाच होत नव्हती.
जिकडे पाहावे तिकडे हिरवा आणि पिवळा रंग पसरलेला होता. इथे lake ची नुसती रेलचेल आहे. दर १० मैलावर १ lake असतो, आणि प्रत्येक lake अतिशय भव्य जणू काय समुद्र च आहे असा भास होतो. आम्ही परत एक lake वर थांबलो, तिथे जेवण केले .
तिथे अजून एक अजबच गोष्ट पाहायला मिळाली .
सायकल रिक्षा टाईप एक वाहन होते त्यात २ ते ६ माणसे बसून प्रत्येकाने पायडल मारायचे होते. आम्ही सर्वजण बसून पूर्ण पार्क मध्ये फेरी मारली. पोरांनी पतंग उडवले. जिथे जाऊ तिथे आम्ही धमालच करत होतो.
संध्याकाळी आम्ही सेलकिर्क स्टेट पार्क मध्ये पोचलो. आजही आम्ही सर्वानी ओंटारिओ lake मध्ये एक अविस्मरणीय संध्याकाळ अनुभवली. तिथे गेल्यावर आम्ही मिनी गोल्फ ला गेलो आणि सर्वानी go-carting केले.
मिनी गोल्फ मध्ये राम सर्वात छान खेळला. त्याचा score सर्वात कमी झाला. राम ने आणि जय ने तर खूपच एंजॉय केले. एकूण १८ प्रकारचे पॉईंट होते. प्रत्येक पॉईंट मद्ये कमीत कमी वेळेत बॉल न्यावयाचे होता, हा प्रकार नवीनच असल्याने खूप मजा आली.
प्रत्येक खेळाचा आणि प्रत्येक क्षणाचा आम्ही सर्वानी खूप आनंद घेतला. जय आणि राम तर पाणी काय, जंगल काय, हिरव्या-हिरव्या शेतात काय मनसोक्त आनंद घेतला आणि ८ दिवसाची भरपूर धमाल केली .
आम्ही सर्वानी रात्री केबिन मध्ये येऊन कॅम्प fire केले, गाणी म्हटली विजय भाऊंनी तर एक खूप सुंदर गाणे म्हटले, त्यांचे गाणे खूप जुने पण अर्थ पूर्ण होते आम्ही सगळे मंत्रमुग्ध झालो. जय आणि राम सहित सर्वानी पत्ते पण खेळले. जय तर बदाम सात या खेळात २ वेळा जिंकला.
दुसरे दिवशी आम्ही lake ओंटारिओ च्या वेगळ्या beach वर गेलो . तेथील पाणी एव्हढे स्वच्छ आणि नितळ होते की खालचा तळ दिसत होता परत आम्ही सर्वानी त्या बीच वर खूप मजा केली, कारण कितीही लांब गेले तरी पाणी खोल नव्हते.
जय आणि विजय भाऊ आणि रामने मिळून एक सुंदर किल्ला बनवला. त्याला लाईट हाऊस पण बनवले , जाणारी येणारी माणसे थांबून किल्ला बघत होते .
किल्ल्यावर रामने पानाचा झेंडा लावला होता. राम आणि जय ने वाळूत आपापली नावे लिहून धमाल केली. आम्ही बीचवर खमंग बिर्याणी घेऊन गेलो होतो. आत्ता पर्यंत अपुऱ्या सामना निशी केलेली एव्हढी खमंग बिर्याणी कुणीच खाल्ली नव्हती. धन्यवाद आश्विनी आणि प्रीती.
आम्ही सर्वानी पतंग उडविण्याचा आनंद घेतले, मी आणि माझ्या विहीन बाई यांनी आयुष्यात प्रथमच पतंग उडविला. आयुष्यात काहीही करायचे शिल्लक ठेवायचे नाही.
रात्री केक आणून आनंद चा वाढ दिवस साजरा केला. त्याला आम्ही सरप्राईज देणार होतो पण ऐनवेळी जय ने सांगून टाकले तरी पण अनु आणि आम्हाला खूप छान वाटले.
ट्रिपचा शेवट खूप गोड आणि छान झाला कारण आम्ही सर्वानी केक कापला,मेणबत्त्या लावल्या आणि शेवटी खूप काही सुंदर आणि अविस्मरणीय आठवणी घेवून जड अंतःकरणाने आम्ही परतीच्या वाटेल लागलो.
आमच्या वाटेत परत येताना corning glass museum येथे थोडे थांबलो, ते museum देखत खुप सुंदर आणि अप्रतिम होते . आम्ही ते पण खूप आवडीने बघून घेतले. कितीही बघितले तरी मनाचे समाधान होणार नव्हते.
जगातील प्रत्येक देशातून जमा केलेल्या विविध वस्तू येथे होत्या , २०० ते ३०० वर्षाच्या जुन्या आणि दुर्मिळ वस्तू इथे आकर्षक पद्धतीने मांडलेल्या होत्या .
आम्ही इथे मनसोक्त फिरलो, विविध शो पण बघितले. रामने एक वस्तू पण बनवली glass च्या साहाय्याने त्याला पण एक वेगळा अनुभव मिळाला. अशा पद्धतीने आमच्या एकूण जंगल सफरीचा शेवट झाला .
वर्षातून एकदा तरी असे रिफ्रेश होण्यासाठी आणि आपल्या कुटुंबाला पुरेसा वेळ देण्यासाठी भटकंती करावी .































