अमेरिकेतील ऱ्होड आयलंड या राज्यातील PROVIDENCE या ठिकाणी ५ ते ७ जुलै रोजी बि एम एम चे १६ वे अधिवेशन झाले, माझ्या मुलीने २ महिन्यापूर्वी त्याचे बुकिंग केले होते आम्ही पण इथे असल्याने आम्हाला त्याचा आस्वाद घेण्याचा योग आला ते बरेच झाले , कारण आम्ही भारतात सुद्धा एव्हढा सुंदर प्रोग्राम बघितला नव्हता, खूपच सुंदर आयोजन केले होते.
पहिल्या दिवशी महेश मांजरेकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले . त्यानंतर मराठी भाषेचे महत्व सांगणारा आणि त्याचा इतिहास सांगणारा एक प्रोग्राम झाला . त्यात त्यांनी दिंडी काढली, पंढपूर ची वारी दाखवली, आणि विविध संताची माहिती दिलि.
एकाच वेळी दोन ते तीन स्टेज वरती वेगवेगळे कार्यक्रम असत, स्टेज आणि हॉल खूपच भव्य होता आणि गोलाकार बैठक होतो.
झी टि . व्हि. ने एक योजना ठेवली होती त्याप्रकारे त्यांनी सोडत काढून प्रेत्येकी १००० डॉलर बक्षिस ठेवले होते, त्यांच्या तर्फे सा रे ग म प हा कार्यक्रम ठेवला होता त्याची फायनल होती,त्याचे परीक्षक राहुल देशपांडे आणि पद्मजा फेणाणी होते. मी पण एक मराठी गाणे गायले . एकाच वेळी दुसरीकडे प्रशांत दामले यांची पण मुलाखत चालू होती त्याला प्रेक्षकांनी खूप गर्दी केल्याने तो कार्यक्रम दोनवेळा घ्यावा लागला . तसेच वाशिंगटन च्या लोकांनी वस्त्रहरण हे नाटक सादर केले .
दुसर्या दिवशी पुरुष आणि स्त्रिया यांनी डोक्याला फेटा आणि नऊवार साडी घालून सर्वांचे अत्तर लावून आणि गुलाब पाणी शिंपडून स्वागत केले. एक स्त्री एक डॉलरला मोगऱ्याचा गजरा ओरडून ओरडून विकत होति. सर्वांनी पारंपारिक पोषाख करून बहार आणली .
कार्यक्रमा साठी खूप मराठी कलाकार आले होते त्यांच्या सोबत फोटो काढण्याची हौस पुरवून घेतलि. जसे प्रशांत दामले, भार्गवी चिरमुले, पद्मजा फेणाणी, आतिषा नाईक, निखिल राउत ,राहुल देशपांडे ,सारेगामा चे वादक यांच्या सोबत फोटो काढून घेतले, भारतात सुद्धा एव्हढे कलाकार कधी एकत्र आले नसते. प्रिया बापट, वैभव मांगले, उमेश कामत, सोनाली कुलकर्णी, अभिजित खांडकेकर,अनिकेत विश्वासराव हे पण होते.
providence ही सिटी खूपच सुंदर होती , आमचे हॉटेल कॅपिटल बिल्डींग च्या समोरच होते, रस्त्यावर खूप रंगीबेरंगी फुले फुलली होती सगळीकडे प्रसन्न वातावरण होते.
providence हे शहर ऱ्होड आयलंड या राज्याची राजधानी असून त्यांचे विधानभवन म्हणजे कॅपिटल बिल्डींग आहे ती अगोदर appointment घेवून बघता येते.
हॉल तर एव्हढे मोठ मोठे होते कि एका वेळी तीन ते चार हजार लोक जेवायला बसू शकत होते, पदार्थाची तर एव्हढी रेलचेल होती कि, काय खावे कळत नव्हते. प्रत्येक टेबलावर भारतीय गुढी, आकाश दिवा, तुळशी वृंदावन ठेवलेलं होते. तसेच जेवणात आणि सकाळचा नाश्त यात सर्व भारतीय पदार्थ होते. पुरणपोळी, थालीपीठ, मिसळ, वडापाव, भाजी, पुलाव ,सोलकढी आणि भगर आमटी पण होती आयोजक फारच कल्पक होते . तीन दिवस जिभेची नुसती चंगळ झाली .
सारेगामापा च्या रात्री भार्गवी चिरमुले आणि उर्मिला कानेटकर यांचे क्लासिकल डान्स ठेवले होते ते अप्रतिम होते. सर्वच कार्यक्रम विचार पूर्वक ठेवलेले होते. त्यात युवक, लहान आणि मोठ्या व्यक्तींसाठी वेगवेगळे पोग्राम होते.
दुसरे दिवशी संगीत मानापमान नाटक होते त्यातील सर्वच कलाकार कसदार अभिनय करीत होते, राहुल देशपांडे तर अभिनयाचा एक्काच.त्याने म्हटलेली नाट्य गीते खूपच श्रवणीय होति. त्याचा शास्त्रीय संगीता वरचा प्रभाव तर दिसतच होता .
नुपूर डान्स अकेडमी न्यू जर्सी यांचा नृत्य नाट्य अविष्कार खेळ मांडला हा कार्यक्रम तर उत्कृष्टच होता . मुले खूपच नृत्यात हुशार आणि तरबेज होति. त्यांनी वेस्टर्न आणि भारतीय पद्धतीचे दोन्ही पद्धतीचे डान्स खूपच अप्रतिम केले . अकादमी च्या संचालिका तर खुपच सुंदर डान्स करीत होत्या .
त्याच रात्री सुप्रसिध्द संगीतकार अजय - अतुल यांचा कार्यक्रम होता, कार्यक्रमा ला एक तास उशीर झाला तर प्रेक्षकांनी थिएटर डोक्यावर घेतले आणि प्रोग्राम लवकर सुरु करण्यास भाग पाडले . त्या दोघांच्या मुलाखतीचा प्रोग्राम होता पण प्रेक्षकांनी त्यांना गाणी गाण्यास पण भाग पाडले . आता वाजले कि बारा, अप्सरा आली या गाण्याला तर लोकांनी डोक्यावरच घेतले आणि सर्वजन डान्स करायला लागले माहोल एकदम भारावून गेले. अजय अतुल यांना सार्थक झाले असे वाटले असेल.
एव्हढे मोठे कलाकार होवून सुद्धा ते एकदम विनम्र होते. नटरंग ची गाणी आम्ही नाही केली ती आपोआप झाली असे त्यांनी सांगितले . जीवनात किती खडतर प्रसंग आले पण त्यातून तावून सुलाखून आले त्याची कहाणी कथन केली
दुसर्या दिवशी वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचे सन्मान करण्यात आले. अश्विनी भावे हिच मेलांज हा शास्त्रीय संगीतावर आधारित कार्यक्रम झाला .
आता निरोपाचा दिवस उगवला , निरोपाचा कार्यक्रम कसा आहे माहित नव्हते पण सर्वात कळस म्हणजे हा अप्रतिम कार्यक्रम होता त्यात महाराष्ट्र मधील सुप्रसिध्द कलाकार होते. प्रत्येकाने आपापला पर्फार्मंस खूपच उत्कृष्ट केला .
सोनाली कुलकर्णीच्या अप्सरा आली या गाण्याला जशी दाद मिळाली तशीच दाद वैभव मंगले याने लता मंगेशकर च्या आवाजात म्हटलेल्या गाण्याला मिळाली सगळ्यांनी उभे राहून मानवंदना दिली . उमेश कामत, प्रिया बापट, भार्गवी चिरमुले, अभिजित खाण्डकेकर, आतिषा नाईक ,वैभव मांगले ,अनिकेत विस्वास राव यांनी खूपच अप्रतिम नृत्ये केलि.
एकूण सर्वच प्रोग्राम अप्रतिम झाला तसेच सर्व व्यवस्था अप्रतिम होती तसेच खाण्यापिण्याची पण चंगळ होति. त्यामुळं असा कार्यक्रम पुन्हा पुन्हा पाहायला आवडेल .
त्याच दिवशी पद्मजा फेणाणी आणि अभिजित खांडकेकर याचा वाढदिवस असल्याने स्टेजवर दोघांना पुष्पगुच्छ देवून तो सर्वांनी साजरा केला . अभिजित खांडकेकर याचे निवेदन उत्कृष्ट होते.
एकूणच सर्व कार्यक्रमाचा निरोप घेताना हुरहूर वाटत होति. परत पुढच्या वेळी कार्यक्रमाला येण्याची आशा करून घरी परत आलो. सर्वाना त्यांनी चिवडा - लाडू, चाफ्याचे फुल, आणि कॅलेन्डर दिले .
असा कार्यक्रम पुन्हा पुन्हा पहावासा वाटेल . thanks बि.एम.एम.
पहिल्या दिवशी महेश मांजरेकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले . त्यानंतर मराठी भाषेचे महत्व सांगणारा आणि त्याचा इतिहास सांगणारा एक प्रोग्राम झाला . त्यात त्यांनी दिंडी काढली, पंढपूर ची वारी दाखवली, आणि विविध संताची माहिती दिलि.
त्यानंतर प्रेमाचे आणि त्यागाचे महत्व सांगणारा र्हदयनाथ मंगेशकर यांच्या गाण्यावर आधारित स्वर गंगेच्या काठावरती हा कार्यक्रम झाला त्यातील कलाकार स्थनिक BOSTON येथील होते त्यांनी पण खूप छान सादरीकरण केले
त्यानंतर फमिली ड्रामा हे मराठी कलाकारांनी सादर केलेले नाटक होते, त्याची हि कथा खूप सुंदर होति. त्यात घरातील पुरुष शिस्तीचा असतो पण घरात आलेल्या आगंतुक पाहुण्यामुळे त्याच्या जीवनात कसा फरक पडतो हे दाखवले, त्यात सुकन्या कुलकर्णी, अजित भुरे,भक्ती देसाई आणि निखिल राउत यांनी खूपच छान कामे केलि.एकाच वेळी दोन ते तीन स्टेज वरती वेगवेगळे कार्यक्रम असत, स्टेज आणि हॉल खूपच भव्य होता आणि गोलाकार बैठक होतो.
झी टि . व्हि. ने एक योजना ठेवली होती त्याप्रकारे त्यांनी सोडत काढून प्रेत्येकी १००० डॉलर बक्षिस ठेवले होते, त्यांच्या तर्फे सा रे ग म प हा कार्यक्रम ठेवला होता त्याची फायनल होती,त्याचे परीक्षक राहुल देशपांडे आणि पद्मजा फेणाणी होते. मी पण एक मराठी गाणे गायले . एकाच वेळी दुसरीकडे प्रशांत दामले यांची पण मुलाखत चालू होती त्याला प्रेक्षकांनी खूप गर्दी केल्याने तो कार्यक्रम दोनवेळा घ्यावा लागला . तसेच वाशिंगटन च्या लोकांनी वस्त्रहरण हे नाटक सादर केले .
दुसर्या दिवशी पुरुष आणि स्त्रिया यांनी डोक्याला फेटा आणि नऊवार साडी घालून सर्वांचे अत्तर लावून आणि गुलाब पाणी शिंपडून स्वागत केले. एक स्त्री एक डॉलरला मोगऱ्याचा गजरा ओरडून ओरडून विकत होति. सर्वांनी पारंपारिक पोषाख करून बहार आणली .
कार्यक्रमा साठी खूप मराठी कलाकार आले होते त्यांच्या सोबत फोटो काढण्याची हौस पुरवून घेतलि. जसे प्रशांत दामले, भार्गवी चिरमुले, पद्मजा फेणाणी, आतिषा नाईक, निखिल राउत ,राहुल देशपांडे ,सारेगामा चे वादक यांच्या सोबत फोटो काढून घेतले, भारतात सुद्धा एव्हढे कलाकार कधी एकत्र आले नसते. प्रिया बापट, वैभव मांगले, उमेश कामत, सोनाली कुलकर्णी, अभिजित खांडकेकर,अनिकेत विश्वासराव हे पण होते.
providence ही सिटी खूपच सुंदर होती , आमचे हॉटेल कॅपिटल बिल्डींग च्या समोरच होते, रस्त्यावर खूप रंगीबेरंगी फुले फुलली होती सगळीकडे प्रसन्न वातावरण होते.
providence हे शहर ऱ्होड आयलंड या राज्याची राजधानी असून त्यांचे विधानभवन म्हणजे कॅपिटल बिल्डींग आहे ती अगोदर appointment घेवून बघता येते.
हॉल तर एव्हढे मोठ मोठे होते कि एका वेळी तीन ते चार हजार लोक जेवायला बसू शकत होते, पदार्थाची तर एव्हढी रेलचेल होती कि, काय खावे कळत नव्हते. प्रत्येक टेबलावर भारतीय गुढी, आकाश दिवा, तुळशी वृंदावन ठेवलेलं होते. तसेच जेवणात आणि सकाळचा नाश्त यात सर्व भारतीय पदार्थ होते. पुरणपोळी, थालीपीठ, मिसळ, वडापाव, भाजी, पुलाव ,सोलकढी आणि भगर आमटी पण होती आयोजक फारच कल्पक होते . तीन दिवस जिभेची नुसती चंगळ झाली .
सारेगामापा च्या रात्री भार्गवी चिरमुले आणि उर्मिला कानेटकर यांचे क्लासिकल डान्स ठेवले होते ते अप्रतिम होते. सर्वच कार्यक्रम विचार पूर्वक ठेवलेले होते. त्यात युवक, लहान आणि मोठ्या व्यक्तींसाठी वेगवेगळे पोग्राम होते.
दुसरे दिवशी संगीत मानापमान नाटक होते त्यातील सर्वच कलाकार कसदार अभिनय करीत होते, राहुल देशपांडे तर अभिनयाचा एक्काच.त्याने म्हटलेली नाट्य गीते खूपच श्रवणीय होति. त्याचा शास्त्रीय संगीता वरचा प्रभाव तर दिसतच होता .
नुपूर डान्स अकेडमी न्यू जर्सी यांचा नृत्य नाट्य अविष्कार खेळ मांडला हा कार्यक्रम तर उत्कृष्टच होता . मुले खूपच नृत्यात हुशार आणि तरबेज होति. त्यांनी वेस्टर्न आणि भारतीय पद्धतीचे दोन्ही पद्धतीचे डान्स खूपच अप्रतिम केले . अकादमी च्या संचालिका तर खुपच सुंदर डान्स करीत होत्या .
त्याच रात्री सुप्रसिध्द संगीतकार अजय - अतुल यांचा कार्यक्रम होता, कार्यक्रमा ला एक तास उशीर झाला तर प्रेक्षकांनी थिएटर डोक्यावर घेतले आणि प्रोग्राम लवकर सुरु करण्यास भाग पाडले . त्या दोघांच्या मुलाखतीचा प्रोग्राम होता पण प्रेक्षकांनी त्यांना गाणी गाण्यास पण भाग पाडले . आता वाजले कि बारा, अप्सरा आली या गाण्याला तर लोकांनी डोक्यावरच घेतले आणि सर्वजन डान्स करायला लागले माहोल एकदम भारावून गेले. अजय अतुल यांना सार्थक झाले असे वाटले असेल.
एव्हढे मोठे कलाकार होवून सुद्धा ते एकदम विनम्र होते. नटरंग ची गाणी आम्ही नाही केली ती आपोआप झाली असे त्यांनी सांगितले . जीवनात किती खडतर प्रसंग आले पण त्यातून तावून सुलाखून आले त्याची कहाणी कथन केली
दुसर्या दिवशी वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचे सन्मान करण्यात आले. अश्विनी भावे हिच मेलांज हा शास्त्रीय संगीतावर आधारित कार्यक्रम झाला .
आता निरोपाचा दिवस उगवला , निरोपाचा कार्यक्रम कसा आहे माहित नव्हते पण सर्वात कळस म्हणजे हा अप्रतिम कार्यक्रम होता त्यात महाराष्ट्र मधील सुप्रसिध्द कलाकार होते. प्रत्येकाने आपापला पर्फार्मंस खूपच उत्कृष्ट केला .
सोनाली कुलकर्णीच्या अप्सरा आली या गाण्याला जशी दाद मिळाली तशीच दाद वैभव मंगले याने लता मंगेशकर च्या आवाजात म्हटलेल्या गाण्याला मिळाली सगळ्यांनी उभे राहून मानवंदना दिली . उमेश कामत, प्रिया बापट, भार्गवी चिरमुले, अभिजित खाण्डकेकर, आतिषा नाईक ,वैभव मांगले ,अनिकेत विस्वास राव यांनी खूपच अप्रतिम नृत्ये केलि.
एकूण सर्वच प्रोग्राम अप्रतिम झाला तसेच सर्व व्यवस्था अप्रतिम होती तसेच खाण्यापिण्याची पण चंगळ होति. त्यामुळं असा कार्यक्रम पुन्हा पुन्हा पाहायला आवडेल .
त्याच दिवशी पद्मजा फेणाणी आणि अभिजित खांडकेकर याचा वाढदिवस असल्याने स्टेजवर दोघांना पुष्पगुच्छ देवून तो सर्वांनी साजरा केला . अभिजित खांडकेकर याचे निवेदन उत्कृष्ट होते.
असा कार्यक्रम पुन्हा पुन्हा पहावासा वाटेल . thanks बि.एम.एम.
You have well described and presented a real picture of soooo beautiful programme before us.
ReplyDeleteWe missed it.
Kaku faarch chaan.. khupach lively watey vachtana..
ReplyDelete