इथून दिड तासाच्या अंतरावर मिस्टिक अक्वेरियम आहे.आता रामच्या सुट्या संपत आल्या म्हणून आम्ही त्याला घेवुन गेलो.सोबत अंजलि,तिचे सासु,सासरे पण होते.
तिथे गेल्या गेल्या आम्हाला pandhara शुभ्र बेलुगुव्हेल फिश दिसला,आम्हाला नाव माहित नव्हते पण रामने आम्हाला ते बरोबर करून सांगितले.कारण तो लहान मुलांचे कार्टून बघतो,त्यातलेच ते एक क्यारेक्टर होते.त्यामुले त्याला खुप आनंद
झाला.ते मासे फीडिंग साठी वर येत होते,ते पण बघितले.
त्यानंतर आम्ही सी लायनचा शो बघितला .त्या सर्व माशाना शिकवून ट्रेंड केलेले होते.दोन बॉय लायन आणि दोन गर्ल लायन होते.त्यापैकी एकाच नाव ख्रिस्ती होते.पाण्यावर लाइट पडला की ते मासे प्रेक्षकात येत,आणि त्या स्त्रीने पाय खाली वर केला की तो पन तसेच करीत होता.हाताने नमस्ते करने,उड्या मारने,स्वतः भोवती गिरकी घेणे,असे विविध प्रकार ते सर्व मासे करीत होते.त्यांचा शो पाहून खरच गर्भगलित व्हायला होते..
जेली फिश तर खुपच वेगवेगळ्या प्रकारची होतो.ती सगली अद्भुत दुनियाच होती.समुद्रात एव्हढ्या प्रकारचे जिव रहात
असतील याची कल्पनाच नव्हती.तिथे एक मरीन लाइन शो होता,थ्री डी शो होता.आपण खुर्चीवर बसून खोल समुद्रात जातो.\आणि तिथे तर स्वर्गात गेल्याचाच भास झाला.
वेग़ला जेली फिश.
प्रीति आणि रामने तर हातात स्टार फिश घेतला.
कासव तर रामच्या अगदी जवळच आले,त्यामुले राम तर एकदमच खुश झाला.रामने खुप एन्जॉय केले.
शेवट आम्ही पेंग्विनच्या विभागात गेलो.पेंग्विन भरपूर होते.तसेच रंगीबेरंगी खुपच वेगवेगले पक्षी होते.अक्वेरियम खुपच
छान होते.चार तास कसे गेले कललेच नाही.एका वेगळ्याच दुनियेत आम्ही जावून आलो होतो.जेलीफिश तर एव्हढे सुन्दर होते,
की बघताच रहावे वाटत होते.
रामच्या सुट्टीचा शेवट खुपच छान झाला, मी ज्या उद्देशाने इथे आले,तो माझा उद्देश सफल झाला.राम पण सर्व सुट्टी भर खुश होता,मला पण खुप छान वाटले.
Mavashi atishay chhan lihtes, keep it up
ReplyDeleteमस्त गं ममा, Keep it up!!
ReplyDelete