Thursday, July 19, 2012

bangkok and pattaya

          आम्ही सन टुरिझम तर्फे 27 मे  ते 7 जून असा टूर केला. प्रथम मुंबई ते bangkok आणि नंतर सिंगापूर ,मलेशिया अशी टूर होती. बँकोक इथे दुपारी पोचल्यावर लगेच रात्री आम्ही टिफिनी शो बघितला.थाई स्त्रिया वेगवेगळे पोशाख करून सुंदर डान्स करत होत्या . क्षणाक्षणाला स्टेज बदलत होते डोक्यावर सुंदर सुंदर मुकुट घातल्यामुळे त्या एकदम आकर्षक दिसत होत्या .
       दुसरे दिवशी आम्ही तिथून जवळच असलेल्या पट्टाया बीचवर water स्पोर्ट्स साठी स्पीड बोटने गेलो . तिथे प्यारासेलिंग होते ते आम्ही सर्वांनी अगदी सर्व स्त्रिया आणि पुरुष यांनी हि raid घेतली . आपण प्याराशुट सोबत जस जसे वर तरंगत जातो तस तसे आपण स्वर्गात आहोत असे वाटते.
            हि राईड साधारण 5 मिनिटे होती पण तेव्हढ्या वेळात आपले डोळे गरगरायला लागतात .आपण पक्षी आहोत असे वाटते . त्यानंतर कोरल आयलंड
 वर गेलो . तिथे अंडर वाटर वाक होता . आपल्या डोक्यावर 15 के .जी .वजनाचे
हेल्मेट घालतात त्याला ओक्षिजन ची नळी जोडलेली असते .त्यासह आपण पाण्यात उतरायचे सोबत आपला ग्रुप असतो . त्यांचा हात धरून सरळ पाण्यात चालायचे . कोरल दिसू लागतात आपण त्याला हात लावायचा .मोठमोठे शंख दिसले .आपण जसजसे चालतो आपल्या भोवती सुंदर सुंदर मासे यायला लागता . त्यांना आपण ब्रेडचा तुकडा दिला कि सुळकन जवळ येतात .हा अनुभव अप्रतिम होता .वाटत होते आपण स्वर्गात आहोत .हा अनुभव प्रत्येकाने एकदा तरी जन्मात घ्यावाच असे मला वाटते .लाल,निळे,पिवळे मासे बघून डोळ्याचे पारणे फिटले .अर्ध्या तासाने पाण्या बाहेर आलो ,तेव्हा जीव भांड्यात पडला होता .
   आमची टूर गाईड बो हि खूपच छान होती सगळे तिची खूप थट्ट  करत असत   ती सगळ्याची खूप काळजी घेत असे .
      दुसरे दिवशी आम्ही पटाया वरून bangkok ला गेलो जाताना वाटेत पोटरी
गार्डन येथे गेलो . आमची अनिवर्सरी आणि काही लोकांचे बर्थडे असल्याने
टूर म्यानेजरने आम्हाला पार्टी दिली . केक कापला आणि फिस्ट दिली .
                 
     पोटरी गार्डन खूपच सुंदर होते . पोटरीचे खूप सुंदर सुंदर डिझाईन बनवले होते . आकर्षक आकार बनवले होते .
      सुंदर गार्डन पण बनवले होते . प्राण्यांचे वेगवेगळे आकार बनवले होते .
          याला नांगनूच विलेज म्हणतात तिथे कल्चरल शो पण होता .त्यांचे पारंपारिक पोशाख घालून विविध प्रकार करून दाखवत असत तसेच स्टेज देखील लगेचच बदलत असे . कधी अक्शन बदलत ते काही कळत नसे .खूपच आकर्षक प्रकार होता . चेहर्या वरचे हावभाव टिपण्या सारखे होते .
          
        त्यानंतर एलिफंट शो होता तो पण आकर्षक होता . छोटी छोटी हत्तीची पील्ले कसरती करून दाखवत होते . एकाच वेळी ओळीने येवून विविध प्रकार करीत होते . दोघांनी तर क्यानव्हास वर पेंटिंग पण केले . तेव्हा तर आश्चर्य वाटले . कारण प्राणी माणसापेक्षा खूपच  हुशार असतात .
             
         नांगनूच  व्हिलेज मधून आम्ही bangkok ला निघालो .पटाया  वरून हे अंतर 2 तासाचे आहे . bangkok येथे हॉटेल मध्ये जावून संध्याकाळी चाऊ फ्राय
रीवर क्रुझ वर डिनर होते .गेल्या गेल्या थाई स्त्रीने आमचे आर्किडचे फुल देवून जंगी स्वागत केले . तिथे रीवर क्रुझ अनेक होत्या . हजारो लोक होते . प्रत्येक जनाचा आपला एक ग्रुप होता . क्रुझवर वेलकम ड्रिंक दिले आणि आम्ही तिथे सर्वानि व्हेज, नोंनव्हेज डिनरचा आस्वाद घेतला . तिथे इंडियन डिनर पण होते .
    कृजवर डीनरला जाताना सर्वांनी आपले पारंपारिक कपडे घातले होते . एकाने तर धोतर,टोपी पण घातले होते .        
            
      डिनर नंतरच खरी मजा आली .सर्वांनी भन्नाट डान्स केला . तेथील गायिका
सगळी हिंदी गाणी गात होती आणि आम्ही त्या ठेक्यावर ताल धरून बेभान होवून नाचत होतो . कोणालाही भान नव्हते .सगळे मग्न झाले होते . क्रुझ वर आम्ही जवळ जवळ चार तास होतो . क्रुझ रिव्हर वरून जात असताना विहंगम
दृश्य पहायला मिळत होती . लाईट मध्ये सगळ्या बिल्डींग चमकत होत्या . खूपच छान वाटत होते .हॉटेलवर 12 वाजता पोचलो .
             
        दुसरे दिवशी बंग्कोक सीटि पाहण्यास गेलो . आधी मरीन  सफारी केली . त्यात आपण गाडीत बसून मोकळे फिरणारे प्राणी पाहायचे . ते एकत्रच गुण्या गोविंदाने राहतात, आपली गाडी हळूहळू आवाज न करता चालत असते . सगळ्या जंगली प्राण्यांचे कळप होते . 
         
          जंगल सफारी हॉटेल मध्ये पण जंगलाचीच थीम होती . तिथे हजारो भारतीय जेवणासाठी आले होते .     
           तिथून आम्ही ओरांग उटानचा शो बघितला ते पण वेगवेगळ्या करामती करत होते . त्यानंतर सिलायन शो ,डॉल्फिन शो होता . डॉल्फिन शोच्या वेळी तर कहरच झाला .प्रत्येक देशाचे एक गीत वाजवत होते आणि आपले गीत वाजले कि लोक बेभान होवून नाचत होते . आपले भांगडा गीत वाजले तेव्हा सगळ्यांनी एकच जल्लोष केला . आणि उठून भांगडा केला .
           दुपारी बुद्धाचे मंदिर पाहण्यास गेलो,हि मूर्ती 45 फुट लांब असून ती
झोपलेल्या अवस्थेत आहे . पूर्ण सोन्या पासून बनवलेली आहे .
      हे पण मंदिर खूपच सुंदर होते .तिथे बुद्धाच्या अनेक मूर्ती होत्या . मंदिर खूपच भव्य होते .तसेच खूप स्वच्छ होते. जुन्या खूप वर्षापासूनच्या मूर्ती तेथे होत्या .बंग्कोक हि थायलंड ची राजधानी असून तेथे अजूनही राजेशाही आहे ,
येथील विमानतळ सुवर्णभूमी नावाने ओळखला जातो .एअरपोर्ट खूपच छान आहे .
         रिक्लायनिंग बुद्धाचे मंदिर पण सुंदर आहे . त्या दिवशी काहीतरी प्रोग्राम होता म्हणून सुंदर फुलांनी रथ सजवले होते .
       हि मूर्ती पण 5.5 टन सोन्याची आहे . ती चीनी लोकांनी मिळून बनवली आहे . मंदिरात तिनी बाजूने सोन्याच्या पत्र्याच्या कमानी आहेत .
 
      बुध्दाची मूर्ती पण आकर्षक आहे . इथे खूप बुद्धाची मंदिरे आहेत . ती एकदम स्वच्छं आहेत .
      सगळ्यात शेवटी इंद्र मार्केट मध्ये शॉपिंग केले आणि थायलंडला राम राम केला . दुसरे डेस्टीनेशन  सिंगापूर होते .      
                                          

2 comments: