Friday, December 7, 2012

heaven of the earth,SINGAPORE

          आम्ही थाईलंड वरून सिंगापोर येथे निघालो, थाईलंडचे एअर पोर्ट खूपच सुंदर होते. एअरपोर्टवर एके ठिकाणी समुद्र मंथन हा देखावा मूर्ती रूपाने केला होता.सुवर्णभूमी हे विमानतळाचे नाव होते. सकाळी लवकर उठून निघालो.सिंगापोर   स्थानिक वेळेनुसार ११ वाजता पोचलो. विमानतळ वर पोचल्या पोचल्या स्वच्छतेचे साम्राज्य दिसले. कुठेही एव्हढाही कचरा दिसत नव्हता. इथे ऑन दि स्पोट दंड घेतात म्हणून लोकांना स्वच्छतेची सवय लागलेली आहे. जिकडे पाहावे तिकडे  हिरवेगार दिसत होते. रस्त्याची दोन्ही बाजूला हिरवाईच  दिसत होती . डोळ्यांना एकदम थंडावा जाणवत होता. एकदम प्रसन्न वाटत होते.
     हॉटेलवर पोचल्यावर आम्ही फ्रेश होवून syantosa आईलंड पाहण्यासाठी गेलो. आईलंडला जाण्यासाठी आम्ही केबल कारचा खूपच सुंदर प्रवास केला. केबल कार मधून जाताना खूपच विहंगाम दृश्य दिसत होते. एका बाजूला नितळ समुद्र , दुसर्या बाजूने  युनिवर्सल studio ,कौलारू इमारती,गोडावून असे खूपच अप्रतिम दृश्य दिसत होते. रस्त्यावरून जाणार्या छोट्या छोट्या कार होत्या .
      सेन्टोसा आयलंड येथे आम्ही तीन चार राईड घेतल्या.  स्काय वाक होता  
त्याच्या भोवती एक गोलाकार केबिन होती.त्यात बसायचे ,ती केबिन गोल गोल फिरत वरती जाते. तिथून पण विहंगम दृश्य दिसत होते. दुसरी राईड होती. अंडर वाटर वर्ल्ड ,गोलाकार एस्केलेटर वरून फिरत फिरत फिश बघायचे. वरून ,बाजूने सर्व बाजूनी फिशच फिश होते,समुद्रात असल्या सारखे वाटत होते.
     तिसरी राईड इमेजेस ऑफ सिंगापोर हि होती. यात सिंगापोरचा सर्व इतिहास मूर्ती रुपात चित्रित केला होता. त्यानंतर pearatus ऑफ कॅराबिअन हा थ्री डी
सिनेमा बघितला.
     त्यानंतर रात्री समुद्र काठी एक सुंदर कहाणी असलेला लेजर शो होता .तो तर खूपच अप्रतिम होता. रंगी बेरंगी लाईट सोडलेले होते आणि अचानक कारंजी उसळून येत, तसेच पाण्याचे वेगवेगळे आकाराचे फवारे उडत. एक सुंदर शो आम्ही बघितला. हा शो अर्ध्या तासाचा होता.
       दुसर्या दिवशी काही लोक युनिवर्सल स्टुडीओला गेले .आम्ही आमची भाची
अपर्णा हिच्याकडे गेलो, आमचा लग्नाचा वाढदिवस असल्याने तिने केक आणला आणि जंगी पार्टी दिली.तिथून तिने आम्हाला मरीना बे ह्या ५६ मजली हॉटेल वर नेले , तिथे ५६ व्या मजल्यावर स्विमिंग पूल आहे. तो बघितला. तसेच तिथून सिंगापोर फ्लायर ,मर्लायान ,म्युझियम,समुद्र असे खूपच विहंगम दृश्य
दिसत होते.
          हॉटेलमध्ये ५६ व्या मजल्यावर स्विमिंग करताना काय थ्रिलिंग वाटत असेल ,त्यानंतर प्रसिद्ध मुस्ताफा मार्केट मध्ये थोडे शॉपिंग केले .                                         इथे जगातील एकमेव अशी नाईट सफारी आहे. रात्रीच्या अंधारात उघड्या गाडीतून मनमोकळे फिरून जंगली प्राणी बघायचे . जिथे जिथे प्राण्यांचे कळप मुक्तपने  विहरत होते, त्या जागी लाईट सोडलेले होते. अंधारात जंगली प्राणी मुक्तपणे पाहणे हा एक थ्रिलिंग अनुभव होता . कुणाला मध्येच उतरायचे असेल तर गाडीतून उतरून ट्रेल वरून फिरत फिरत स्टेशनवर परत यायचे . कुठेही क्यामेरा वापरायचा नाही. कारण लाईट मुळे  प्राणी बिचकत असत. किर्र  अंधारात मोकळे फिरून जंगली प्राणी बघणे हा अविस्मरणीय अनुभव होता.
          तिसर्या दिवशी सिटी टूर होती. यात प्रथम मर्लायन पार्क होते. अर्धे शरीर मासा आणि अर्धे शरीर सिंह अशी मूर्ती आहे. एक राजा जेव्हा या शहरात आला तेव्हा त्याला प्रथम सिंह दिसला आणि नंतर मासे म्हणून त्याने हा सिंगापोरचा
राष्ट्रीय सिम्बॉल केला. सिंह दिसला म्हणून सिंगापोर हे नाव पडले.
       सिंगापोर फ्लायर हे दुसर सुंदर ठिकाण. सध्या जगात सर्वात उंच हे गोल रिंग आहे कारण लंडन आय पेक्षा हे उंच आहे. गोलाकार मोठ्या चाकाला थोड्या थोड्या अंतरावर छोट्या छोट्या केबिन आहेत,त्यात अंदाजे ३०-४०लोक उभे राहू शकतात. ह्या केबिन मध्ये टेबल आणि खुर्च्या पण ठेवलेल्या आहेत. ह्या फ्लायर मधून पूर्ण सिंगापोर चा व्ह्यू दिसतो, उंच उंच कमर्शियल बिल्डींग मुझीयम,रस्त्यावरून जाणार्या छोट्या छोट्या कार्स, मरीना बे हॉटेल तर खूपच सुंदर दिसत होते.
      आर्किड हे सिंगापोर चे राष्ट्रीय फुल आहे, आम्ही तिथे गेलो. हे गार्डन पण खूपच सुंदर होते , त्यानंतर चायना मार्केट, चोकोलेट ग्यालरी ,बघितली. चोकोलेट  आणि शो च्या वस्तू खरेदी केल्या तसेच मुस्तफा मार्केट मध्ये पण सर्वांनी शो आणि इलेकट्रोनीकच्या वस्तू घेतल्या. मुस्तफा मार्केट हे २४ तास उघडे असते. तसेच इले.च्या वस्तू खूपच स्वस्त मिळतात.
      एकूणच सिंगापोर या छोट्याशा देशाने पर्यटक आपल्या देशाकडे आकर्षित व्हावेत म्हणून खूपच एफर्ट घेतलेले आहेत आणि अजूनही ते बर्याच सुधारणा करीत आहेत. सध्या समुद्र खालून इंडोनेशिया इथे रेल्वे मार्ग करण्याचे काम चालू आहे. इथे भारतीय आणि जवळ पासच्या देशातील हजारो पर्यटक बाराही
महिने येत असतात.
         इथे भारतीय हॉटेल पण खूपच आहेत. एकूणच आमची सिंगापोर ट्रीप खूपच सुंदर आणि अप्रतिम झाली. परत एकदा इथे यायला आवडेल. लांबच्या दुसर्या कुठल्या देशात जाण्या अगोदर इथे जायला हरकत नाही.
          

   

2 comments:

  1. आई खूपच छान लिहिल आहे तुम्ही आणि photos पण मस्त आहेत.

    ReplyDelete
  2. Mavashi, write up and photos, both are really really good. Just like a writer...well done...keep it up.

    ReplyDelete