माझ्या आईचे गुरु श्री साधू महाराज कंधारकर यांनी या वर्षी श्री क्षेत्र द्वारका येथे भागवत सप्ताह ठेवला होता. आम्ही ४ फेब.ला द्वारका येथे पोचलो ५ पासून साप्ताह सुरु होता. उद्घाटनासाठी करवीर पीठाचे जगत्गुरू श्री. शंकराचार्य आले होते. त्यांनी यशवंत महाराज यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे प्रकाशन केले तसेच सर्वाना अमोलिक शब्दात मार्गदर्शन केले. त्यांच्या रसाळ वाणीने त्यांनी सर्वाना मंत्रमुग्ध केले. त्यांचे विचार ऐकण्यासाठी सर्वजन खूप उत्सुक होते. ते आल्या आल्या वातावरण एकदम भारावून गेले होते . २ तास कसे गेले कळले नाही.
दररोजच्या कार्यक्रमाचा क्रम असा होता. सकाळी ७.३० ला विष्णू सहस्त्रनाम पाठ, त्यानंतर साधू सुधा पारायण ९ ते १० नाश्ता आणि त्यानंतर
१० ते २.०० किवा कधी कधी २.३० किवा ३.०० पण वाजत असत. कारण भागवत कथा सांगणारे महाराज इतके सुंदर कथा सांगत कि, किती वेळ झाला कळतच नसे, त्यांना मला वाटते संपूर्ण भागवत ग्रंथच मुखोद्गत असावा.कुठल्या स्कंदात कुठल्या पानावर कोणता श्लोक आहे हे त्यांना तोंडपाठ होते. कथाकार
खूपच विद्वान होते. ते पाथर्डी जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत असे कळले.त्यांच्या वाणीतून जसे काय ब्रम्हदेवच बोलत आहेत असे वाटत असे,त्यांचे नाव ह.भ.प.
जाटदेवळेकर असे होते, ते पाथर्डी तालुक्यात गोशाला चालवतात, त्यांचे हे काम खूपच महान आहे. त्याला भक्तांनी खूप छान प्रतिसाद दिला.
द्वारकाधिश मंदिर तर खुपच अप्रतिम होते हे मंदिर ५००० वर्ष जुने असून ते कृष्णाचा मुलगा प्रद्युम्न आणि नातू अनिरुद्ध यांनी बांधले आहे. हे मंदिर गोमती किनारी असून गोमती नदी इथेच सागराला मिळते, नदी आणि समुद्राचा संगम तर इतके सुंदर ठिकाण आहे. मंदिर सर्व लाल दगडात बांधलेले असून त्यावर सुन्दर कोरीव आणि नाजूक नक्षीकाम केलेले आहे.पण क्यामेरा आत नेता येत नसल्याने फोटो काढता नाही येत याची खंत वाटते. कृष्ण याने
आपल्या अंताच्या वेळी सोन्याची द्वारका समुद्रात बुडविल्याने त्याचे काहीच
अवशेष राहिले नाही म्हणून प्रद्युम्न आणि अनिरुद्ध यांनी देवाचे आर्कीटेक्ट
यांना बोलावून एका रात्रीत हे मंदिर बनवले आहे. त्याचा उंच कळस याची साक्ष देतो, कळसावर ध्वज दिवसातून पाच वेळा फडकतो. त्यासाठी २-२
वर्षे प्रतीक्षा यादी असते. आमचे नशीब बलवत्तर म्हणून आमच्या साधू महाराज संस्थेला त्यावेळी ध्वज चढवण्याचा मान मिळाला. ४० मीटर कापडाचा ध्वज असतो.
ध्वज मंदिरात नेताना तो डोक्यावर मिरवत नेला आणि स्त्रिया आणि टाळकरी यांनी त्याची शहरातून भजन भजन करत मिरवणूक काढली, हा एक छान अनुभव होता.
जसा जशी भागवत कथा पुढे जात होती तस तशी कथेत रंगत येत होती
कृष्ण जन्माच्या वेळी खरा वासुदेव आणि खरा छोटा कृष्ण केला आणि वसुदेवाने छोट्या कृष्णाला टोपलीत घालून डोक्यावर घेवून आणले.
कृष्णाने सर्व सवंगडी आणि गोपिका यांना गोवर्धन पूजेसाठी नेले आणि तिथे देवानाही दुर्लभ असणारा काला केला, तो प्रसंग आम्ही गोवर्धन पर्वत तयार करून साजरा केला. उत्तरोत्तर कथेत रंगत येत होती.
त्यानंतर झाला कृष्ण आणि रुक्मिणीचा विवाह हा प्रसंग तर इतका रंगला कि श्रोते तल्लीन होवून ऐकत होते. खरा कृष्ण आणि खरी रुक्मिणी केली आणि सर्वाना अक्षता वाटून , मंगलाष्टक म्हणून विवाह साजरा झाला. विवाह
नंतर मिष्टान्न भोजन पण होते.
दुसरे दिवशी सर्व महाराज यांची सर्व भक्तांनी मिळून ग्रंथ तुला केली. हा प्रसंग तर अवर्णनीयच होता. दर दिवशी उद्या काय आहे , उद्या काय आहे अशी उत्सुकता होती. सर्व महाराज यांच्या पत्नी यांची पण तुला केली गेली.
दररोज कथा सांगताना मध्येच महाराज भजन करत राधे कृष्ण ,राधे कृष्ण मग तर काय लोक आपले वय विसरून लहान मोठे याचे भान न ठेवता उठून तल्लीन होवून नाचायला लागत. सगळे बेभान होवून नाचत असत.
भागवत कथेचे सात दिवस कसे संपले कळलेच नाही, अजून कथा पुढे चालावी असे वाटत होते. मध्येच एक दिवस आम्ही बारा ज्योतीर्लिंग पैकी एक असे सोरटी सोमनाथ येथे जावून आलो. वाटेत पोरबंदर येथे महात्मा गांधी यांचे घर आणि थोर कृष्ण भक्त सुदामा याचे घर बघितले. याच खोलीत गांधीजीचा जन्म झाला .
गांधीजी यांचे घर भव्य असून ते अजून चांगल्या स्थितीत राखले आहे, तिथे एका भागात कस्तुरबा गांधीजीच्या नावाने वाचनालय सुरु आहे. सुदामा
मंदिर पण छान आहे.
पुढे सोमनाथ येथे जुने आणि नवे अशी दोन मंदिरे आहेत. गझनीच्या महम्दाने सोमनाथ मंदिरावर ७२ वेळा स्वारी करून मंदिर उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. मंदिर भंग झाले म्हणून सरदार वल्लभ भाई पटेल
यांनी सध्याचे नवीन आणि अप्रतिम असे मंदिर बांधले.
समुद्र काठी मंदिर असून तिथे लाईट आणि साऊंड शो दाखविला जातो. सभोवती सुंदर बाग आहे.
मुख्य द्वारके पासून काही अंतरावर बेट द्वारका आहे, तिथे बोटीतून
जावे लागते. बोटीतून जाताना सीगल हे पक्षी समुद्र वरून मुक्तपणे विहार करत होते. मोठ्या बोटीतून जाताना भक्त द्वारकाधीश भगवान कि जय असा जयघोष करत होते.
तिथे पण भगवान श्री कृष्णाचे मंदिर जुने होते ते आता परत नवीन बांधत आहेत. वाटेत आणखी एक ज्योर्तीलिंग नागेश्वर होते त्याचेही दर्शन घेतले.
कृष्णाने जिथे गोपी सोबत आंघोळ केलि आणि गोपींची वस्त्रे पळविली तो गोपी तलाव बघितला. तेथील माती गोपी चंदन म्हणून कपाळाला लावतात.
रुक्मिणी आणि कृष्णाला दुर्वास ऋषि नि शाप दिला म्हणून दोघांचा बारा वर्षे विरह होता, त्यामुळे रुक्मिणी मंदिर गावापासून १ कि.मी. अंतरावर आहे. ते सुद्धा अप्रतिम आहे.
एकूणच हा भागवत सप्ताह अविस्मरणीय होता. संयोजकाचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. कारण त्यांचे संयोजन खूपच छान होते. १२०० लोकाना ८ दिवस २ वेळा जेवण, एक वेळ नाश्ता आणि दोन वेळा चहा अगदी शिस्तीत मिळत होता. कशालाही कमी नव्हते. तसेच खूप लोकांनी रात्रंदिवस
कष्ट केले म्हणून हा कार्यक्रम यशस्वी झाला. असाच दरवर्षी आम्हाला सुवर्ण योग यावा आणि त्यांचे बरोबर आम्हालाही थोडी सेवा घडावी हि ईश्वर चरणी प्रार्थना आहे.
एका भक्ताने काढलेली सुंदर रांगोळी . सुदामा कृष्ण भेट तर एव्हढी रंगली कि सर्वांच्या डोळ्यात अश्रू आले.

फारच छान लिहील आहे. असेच नवनवीन अनुभव घेत जा आणि लिहित रहा. आम्हाला जमलं नाही तरी तुझ्या डोळ्याने सगळं बघायला मिळतं.
ReplyDeleteProud of you Mama!!
Khupach mast...
ReplyDeleteTumche 'SANCHIT' kharech changle asawe, ki itkya sunder karyakramat tumhi sahabhagi zalat, ani aamhala pan he chitra rupat pahata aale.
ReplyDeletemamma, khupach mast....asech, keep reaching n making ur dreams come true.....njoy life like always!!
ReplyDeletetumha sarvanchi aabhari aahe,
ReplyDelete